शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मानवता धावून आली अन् निराधार सुचिताचे पार पडले शुभमंगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 09:09 IST

आदिवासीबहुल तालुक्यातील तान्हा पोड येथील सुचिता ही अवघी पाच वर्षांची असताना वडिलांनी कर्ज आणि पत्नीच्या आजारपणाला कंटाळून २००८ मध्ये आत्महत्या केली. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच आजारी आईनेही देह त्यागला.

- देवेंद्र पोल्हेमारेगाव (जि. यवतमाळ) : कोरोना काळात एकीकडे माणूस माणसाला टाळू लागला असताना दुसरीकडे काही लोक माणुसकी जिवंत असल्याची अनुभूती देत आहेत. त्याचा अनुभव तालुक्यातील तान्हा पोड या कोलाम वस्तीत आई-वडिलांविना पोरक्या सुचिता श्यामराव कुमरे या मुलीच्या विवाहप्रसंगी आला. मानवता धावून आली आणि तिचे शुभमंगल पार पडले.आदिवासीबहुल तालुक्यातील तान्हा पोड येथील सुचिता ही अवघी पाच वर्षांची असताना वडिलांनी कर्ज आणि पत्नीच्या आजारपणाला कंटाळून २००८ मध्ये आत्महत्या केली. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच आजारी आईनेही देह त्यागला. खेळण्या-बागडण्याच्या वयात तिच्यावर वृद्ध आजी-आजोबा आणि दोन लहानग्या भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडली. स्वत:ला सावरत सुचिताने समाजासमोर आदर्श निर्माण केला. मुलगा, सून तारुण्यात गेल्याने खचलेल्या आजी-आजोबांना तिने जगण्याचं बळ दिलं. लहान भावंडांना शासकीय आश्रमशाळेत प्रवेश देऊन शिक्षणाचा श्रीगणेशा गिरवायला लावला. यात तिचे शिक्षण मागे पडले.तिच्यावरील आदर्श संस्कार पाहून तिला लग्नासाठी मागणी होऊ लागली, परंतु जिथे एकवेळच्या जेवणाची भ्रांत होती, तिथे लग्नसोहळा कसा करणार, हा प्रश्न भेडसावू लागला. गावातील काही लोकांनी ही बाब पंचायत समिती सदस्य सुनीता लालसरे व त्यांच्या पतीच्या कानावर घातली. त्यांनी गावकऱ्यांशी विचारविनिमय करून सुचिताची केळापूर तालुक्यातील खैरी येथील सुरेश आत्राम नामक तरुणाशी विवाहगाठ बांधली. लग्न सोहळ्याचा बराचसा खर्च लालसरे दाम्पत्याने उचलला. मोठ्या आनंदात मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत २१ मे रोजी ती विवाह बंधनात अडकून सासरला निघून गेली तेव्हा अवघ्या गावाच्या डोळ्यात आसवे तर‌ळली.

टॅग्स :marriageलग्नYavatmalयवतमाळ