शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगची जागा नसताना वाहतुकीला यवतमाळात शिस्त लागणार कशी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 05:00 IST

येथील टाॅकीज, बँक, दवाखाने, मुख्य बाजारपेठ याशिवाय इतर व्यावसायिक उपयोगांच्या इमारतींमध्ये पार्किंगची सुविधाच नाही. रस्त्याच्या कडेवर दुचाकी, चारचाकी उभी ठेवावी लागते. वाहतूक पोलिसांची टोईंग व्हॅन दुचाकीवर कारवाई करून मोकळी होते. त्यामुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लागणार कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे.  शहरातील अंतर्गत रस्ते, कोचिंग क्लासेससमोरसुद्धा अशीच अवस्था असते. याबाबत निर्णय झालेला नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात वाहतूक नियम मोडले म्हणून कारवाई जोरात केली जाते. प्रत्यक्षात मात्र वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी लागणारी सोई-सुविधा कुठेच उपलब्ध नाही. येथील टाॅकीज, बँक, दवाखाने, मुख्य बाजारपेठ याशिवाय इतर व्यावसायिक उपयोगांच्या इमारतींमध्ये पार्किंगची सुविधाच नाही. रस्त्याच्या कडेवर दुचाकी, चारचाकी उभी ठेवावी लागते. वाहतूक पोलिसांची टोईंग व्हॅन दुचाकीवर कारवाई करून मोकळी होते. त्यामुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लागणार कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे.  शहरातील अंतर्गत रस्ते, कोचिंग क्लासेससमोरसुद्धा अशीच अवस्था असते. याबाबत निर्णय झालेला नाही. 

फूटपाथ अतिक्रमणाच्या विळख्यात   रस्ते रुंदीकरण करून पायी जाणाऱ्यांसाठी शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात फूटपाथ तयार केले आहे. या फूटपाथवर अतिक्रमण झाले असून अनेकांनी आपले व्यवसाय थाटले आहे. त्यामुळे पायी जाणाऱ्यांची अडचण आहे.  

₹ ३,४०,३४,६५० चा दंड भरला वर्षभरातवाहतूक नियम मोडले म्हणून जिल्हा वाहतूक शाखेने मागील वर्षात धडक कारवाई केली. यामुळे वाहनधारकांना तीन कोटी ४० लाख ३४ हजार ६५० रुपयांचा दंड भरावा लागला. आता तर दंडाची रक्कम दुप्पटीने वाढविण्यात आली आहे. 

वाहतूक सिग्नल लागणार कधी ?- शहरातील रस्ते रुंदीकरणाच्या कामात वाहतुकीचे सिग्नल काढून ठेवले. - जवळपास तीन वर्षांपासून शहरात कोणत्याच चौकात वाहतूक सिग्नल सुरू करण्यात आलेले नाही. - वाहतूक सिग्नल नसल्याने चौकांमध्ये अपघाताचे प्रमाणात वाढले आहे. यावर नियंत्रणासाठी सिग्नल लावणे आवश्यक आहे. 

रस्ता सुरक्षिततेसाठी कारवाई अपघात होऊ नये, प्रत्येकाचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी वाहतूक नियम आहेत. नागरिकांनी नियम पाळून स्वत:सोबत दुसऱ्यांनाही सुरक्षित करावे. - प्रदीप शिरस्कर, वाहतूक शाखा प्रभारी 

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस