शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

किती शाळा बंद केल्या आणि का केल्या?; शिक्षण सचिवांनी मागविला अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 13:36 IST

गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा मुद्दा सर्वत्र तापलेला आहे. दोन वर्षानंतर आता पहिल्यांदाच शिक्षण सचिव अशा शाळांचा आढावा घेणार आहेत.

ठळक मुद्दे शिक्षणाधिकाऱ्यांना टाळून कनिष्ठांकडून घेणार आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा मुद्दा सर्वत्र तापलेला आहे. दोन वर्षानंतर आता पहिल्यांदाच शिक्षण सचिव अशा शाळांचा आढावा घेणार आहेत. विशेष म्हणजे, शिक्षणाधिकाऱ्यांना टाळून या आढाव्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. किती शाळा बंद झाल्या, त्या बंद करण्याची कारणे काय, अशी माहिती घेऊन शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना थेट मुंबईत बोलावण्यात आले आहे.शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी ११ जुलै रोजी ही आढावा बैठक बोलावली आहे. केंद्राच्या सूचनेनुसार यदा राज्यातील प्रत्येक शाळेची माहिती यू-डायस प्लस पोर्टलमध्ये भरण्याचे आदेश होते. याच कामाचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे. मात्र गेल्या वर्षीच्या यू-डायस आकडेवारीत आणि यंदा यू-डायस प्लसमध्ये भरलेल्या आकडेवारीत शाळांच्या संख्येत तफावत आहे. यंदा अनेक जिल्हा परिषदांनी आपल्या अखत्यारीतील काही शाळा बंद केल्या. त्यामुळे जिल्ह्यातील किती शाळा बंद करण्यात आल्या, त्या शाळा बंद करण्याची कारणे काय आहेत, आदींची माहिती शिक्षण सचिव जाणून घेणार आहेत. मात्र ही कारणे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगायची नसून समग्र शिक्षा अभियानात काम करणाऱ्या संगणक प्रोग्रामरने सांगायची आहेत. यूडायस प्लस पोर्टलमध्ये शाळांची माहिती भरण्याची जबाबदारी प्रामुख्याने संगणक प्रोग्रामरनेच पार पाडली आहे. त्यामुळे शाळा, तेथील कर्मचारी यांच्याशी थेट संबंध असलेल्या या कर्मचाऱ्यांना शाळा बंद होण्याची खरी कारणेही ठाऊक आहेत. या कारणांवर ११ जुलैच्या बैठकीत चर्चा होणार आहे.पहिल्यांदाच वापरला ‘बंद’ शब्दग्रामीण भागातील शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयावर सातत्याने टीका होत आहे. मात्र या निर्णयाचे तत्कालीन शिक्षण मंत्र्यांपासून तर विद्यमान शिक्षण मंत्र्यांपर्यंत ठाम समर्थन करण्यात आले. आम्ही शाळा बंद करीत नसून समायोजित करीत आहोत, असाच दावा शासकीय यंत्रणेकडून सातत्याने होत राहिला. मात्र शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी आढावा बैठकीसाठी शुक्रवारी दिलेल्या लेखी आदेशात ‘समायोजित’ हा शब्द न वापरता ‘शाळा बंद’ असा स्पष्ट शब्दोल्लेख केला आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र