शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

जगायचे कसे? घरगुती गॅस सिलिंडर वर्षभरात २४१ रुपयांनी महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 05:00 IST

जीवनावश्यक बाब म्हणून केंद्र शासनाने उज्वला गॅस योजना आणली. घरोघरी गॅस सिलिंडर दिले आणि केरोसीन काढून घेतले. आता केरोसीन नाही आणि गॅस सिलिंडरचे दर नियंत्रणाबाहेर आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. यातून परिस्थिती बिकट झाली आहे. सर्वसामान्य महिलांना वाढत्या महागाईने मोठा झटका दिला आहे.

ठळक मुद्देसर्वसामान्य नागरिकांनी गॅस सिलिंडरचा वापर थांबविला : अनेकांना मिळालीच नाही सबसिडी, गावखेड्यात संताप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबातील गॅस सिलिंडर हा जिव्हाळ्याचा विषय आहे. यानंतरही केंद्र शासनाने गॅस सिलिंडरच्या किमती दर महिन्याला वाढविण्याचेच काम केले आहे. गत वर्षभराचा विचार केला तर गॅसच्या किमती २४१ रुपयांनी वाढल्या आहेत. २०१४ चा विचार केला तर गॅस सिलिंडरच्या किमती तब्बल दुपटीने वाढल्या आहेत. या तुलनेत मिळणारी सबसिडी मात्र गायब झाली आहे. यातून गृहिणींचे बजेट मात्र कोलमडले आहे. जीवनावश्यक बाब म्हणून केंद्र शासनाने उज्वला गॅस योजना आणली. घरोघरी गॅस सिलिंडर दिले आणि केरोसीन काढून घेतले. आता केरोसीन नाही आणि गॅस सिलिंडरचे दर नियंत्रणाबाहेर आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. यातून परिस्थिती बिकट झाली आहे. 

घर खर्च भागवायचाकसा 

सर्वसामान्य महिलांना वाढत्या महागाईने मोठा झटका दिला आहे. दर महिन्याचे बजेट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशा परिस्थितीत दोन पैसे वाचणे तर दूरच राहिले, उलट खर्च वाढला आहे. सरकारने महागाई नियंत्रित करावी.                                     - दुर्गा गादेवार, गृहिणी

२०१४ मध्ये ४८० रुपयाला सिलिंडर मिळत होते. आता सिलिंडरची किंमत ८६८ रुपये झाली आहे. सहा वर्षात सिलिंडरची किंमत दुप्पटीने वाढली आहे. सबसिडी मात्र गायब झाली आहे.  यातून महिलांमध्ये संतापाची लाट आहे. - उषा मुरखे, गृहिणी 

गावांत पुन्हा चुली पेटल्या उज्वला गॅस योजनेतून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना गॅस सिलिंडरच्या जोडणीसाठी मदत देण्यात आली. यातून गॅस कनेक्शन वाढले. आता गॅस भरायलाही पैसे नाही. गॅस सिलिंडरची संख्या वाढल्याने गावामधील केरोसीन बंद करण्यात आले आहे. आता गॅस सिलिंडरचे दर वाढलेले आहे. मात्र केरोसीन गावात उपलब्ध नाही. आदिवासी दुर्गम भागात महिलांनी गॅस सिलिंडरवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली होती. एक वेळा सिलिंडर खरेदी केल्यानंतर आता जवळ पैसे नाही. यामुळे ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटल्या आहेत. परिसरातील जलतन गोळा करून महिला गॅस असतानाही चुलीवर स्वयंपाक करीत आहे. यावरून ग्रामीण भागातील भीषण वास्तव्य पुढे आले आहे. 

जुलैमध्ये २५ रुपयाने वाढले दर  घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती दर महिन्याला वाढतच आहे. आता जुलै महिन्यात नव्याने २५ रुपयांची भर पडली आहे. यामुळे ८६८ रुपयाला सिलिंडर खरेदी करावे लागणार आहे. 

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर