शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलांच्या हाती ई-सिगारेट येतेच कशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 18:05 IST

प्रशासनाला केव्हा येणार जाग : फॅशन साहित्याच्या दुकानातून विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मानवी आरोग्याला घातक असलेली प्रतिबंधित ई-सिगारेट आता शहरातील शाळकरी मुलांच्या हाती पोहोचली आहे. राजरोसपणे या सिगारेटची विक्रीची केली जात आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात अशी सिगारेट विकणारे सक्रिय आहेत. त्यानंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही. नशेच्या आहारी जाऊन शाळकरी मुलांचे जीवन उद्ध्वस्त होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

१२ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांना व्यसनाच्या नादी लावण्याचे काम होत आहे. प्रतिबंधित असणारी ई-सिगारेट प्रचलित असल्याप्रमाणे विकली जात आहे. सहज उपलब्ध होत असल्याने शाळकरी मुले तिला बळी पडत आहेत. पालकांचे दुर्लक्षही यासाठी कारणीभूत ठरते. मुलगा कुठे जातो, काय करतो हे तपासले जात नाही. त्याच्या दप्तरात कुठल्या वस्तू असतात, याचीही झडती घेण्यात येत नाही. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होत आहे.

नशा केलेली मुले आक्रमकई-सिगारेटची नशा केल्यानंतर मुले प्रचंड आक्रमक होतात. त्यांचे भावनांवर नियंत्रण राहत नाही. अशा मुलांपासून शाळेतील इतर मुलांनाही धोका होऊ शकतो.

पालकांनी राहावे सतर्कमुलगा शाळा, ट्युशन यात व्यस्त असतो; तर पालक आपल्या दैनंदिन कामकाजात गुंतलेले असतात. मुलांसोबत त्यांचा पुरेसा संवाद होत नाही. मुले नेमकी काय करतात, कोणासोबत राहतात, याची माहिती नसते. पालकांनी जागरूक होऊन मुलांशी नियमित संवाद ठेवावा. त्याच्या शाळेतील, घराजवळच्या आणि ट्युशनमध्ये असणाऱ्या मित्रांची माहिती घ्यावी. जेणेकरून मुले व्यसनाला बळी पडणार नाही.

या ठिकाणी होत आहे विक्रीविदर्भ हाऊसिंग सोसायटीतील गोधनी रोड ते माईंदे चौक मार्गावर, दारव्हा मार्गावर एका शोरूमच्या बाजूला इ-सिगारेट सहज मिळते. दोन्ही दुकानांतून फॅशन साहित्य विकले जाते; तर धामणगाव मार्गावर शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरात हुक्का विकला जातो. 

या अवयवांवर होतो परिणामइ-सिगारेटच्या सेवनामुळे शरीरातील फुप्फुस, हृदयाच्या पेशी आणि मूत्रपिंडावर परिणाम होतो. लहान मुलांना याचे व्यसन जडल्यास दुर्धर आजारांनी अगदी कमी वयात त्यांचे शरीर निकामी होऊ शकते.

२०० रुपये ते दोन हजारांपर्यंत ई-सिगारेट आहेइ-सिगारेट बाजारात वेगवेगळ्या नावांनी उपलब्ध आहे. २०० रुपये ते दोन हजारांपर्यतची ही सिगारेट आहे. यातील लिक्विडच्या क्षमतेवरून तिची किंमत ठरते.

"इ-सिगारेट विक्री करणाऱ्यांची गोपनीय माहिती काढून त्यांच्याविरोधात मोहीम उघडण्यात येईल. प्रतिबंधित पदार्थ व वस्तू विकणाऱ्यांची गय केली जाणार नाही."- कुमार चिंता, एसपी

टॅग्स :CigaretteसिगारेटYavatmalयवतमाळHealthआरोग्य