शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
2
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
3
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
4
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
5
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
6
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
7
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
8
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
9
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
10
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
11
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
12
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
13
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
14
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
15
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
16
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
17
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
18
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
19
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
20
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?

घरकुलाचे ‘जनधन’ येते आणि जाते..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:16 IST

पंतप्रधानांनी राबविलेली जनधन बँक खात्यांची संकल्पना आता पंतप्रधानांच्या नावाने सुरू असलेल्या घरकुल योजनेतच अडसर ठरू लागली आहे.

ठळक मुद्देविड्रॉलचे वांदे : नऊ हजार लाभार्थी पैशाच्या प्रतीक्षेत

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पंतप्रधानांनी राबविलेली जनधन बँक खात्यांची संकल्पना आता पंतप्रधानांच्या नावाने सुरू असलेल्या घरकुल योजनेतच अडसर ठरू लागली आहे. जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) योजनेत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या जनधन खात्यात ६० हजार रुपयांचा निधी जमा होतोय. पण या खात्यातून ५० हजारांपेक्षा जास्त विड्रॉल करता येत नसल्याने हा निधी योजनेच्या राज्यस्तरीय बँक खात्यात परत जातोय.जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेत २०१६-१७ मध्ये ९ हजार ६६ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहे. त्यांना पहिल्या टप्प्यातील ३० हजार रुपये मिळाले. मात्र बांधकाम अर्धवट झालेले असताना दुसºया टप्प्यातील ६० हजारांचा निधी खात्यात येऊनही लाभार्थ्यांना मिळेनासा झाला. कारण बहुतांश लाभार्थ्यांनी या योजनेत जनधन खात्याचाच क्रमांक दिला आहे. या खात्यात ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्यास ती विड्रॉल करता येत नाही. परंतु, योजनेच्या सॉफ्टवेअरमध्ये पैसे अदा झाल्याबाबत ‘क्रेडिट कन्फर्मेशन’ असा संदेश येतो. प्रत्यक्षात हा निधी लाभार्थ्यांना न मिळता योजनेच्या केंद्रीय खात्यात जमा होत आहे. अशी अनेक प्रकरणे निस्तरता निस्तरता संबंधित गटविकास अधिकाºयांच्या नाकीनऊ येत आहे.पूर्वीप्रमाणे योजनेचा निधी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून न येता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जात आहे. त्यामुळे जनधनचा घोळ निस्तरणे जिल्हास्तराच्या आवाक्याबाहेर गेले. प्रधानमंत्री आवास योजनेप्रमाणेच रमाई आवास योजना आणि शबरी आदिवासी घरकुल योजनेतही लाभार्थ्यांनी जनधनचीच खाती दिलेली असून निधी येऊनही विड्रॉलच्या अडचणी निर्माण होत आहेत.घरकुलांचे ‘टार्गेट’ घटलेजिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेत २०१७-१८ वर्षाकरिता ४ हजार ६६९ लाभार्थ्यांचे ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. रमाई आवास योजनेतून १ हजार ८३२ घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे. तर शबरी आदिवासी घरकुल योजनेत ५७९ लाभार्थी निवडण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षी विविध योजनेतून १२ हजार घरकुलांना मंजुरी मिळालेली असताना यंदा टार्गेट घटवून केवळ ७ हजार ८० घरकुले होण्याची शक्यता आहे. शिवाय पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेतून ६५ लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा घेण्याकरिता ५० हजारांचा निधी मिळणार आहे.अखेर निधीचे टप्पे वाढघरकुल योजनेचे १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान ३ टप्प्यात देण्यात येते. पहिला आणि तिसरा टप्पा ३० हजारांचा असला तरी दुसरा टप्पा ६० हजारांचा असल्याने जनधनमधून तो विड्रॉल होत नाही. त्यामुळे केंद्र शासनाने आता निधी वितरणाचे पाच टप्पे पाडून दिले आहेत. पहिले तीन टप्पे प्रत्येकी ३० हजारांचे असतील, चौथा टप्पा २० हजारांचा तर पाचवा टप्पा १० हजार रुपयांचा असेल. या पाच टप्प्यात जमा झालेला निधी जनधनच्या खात्यातून लाभार्थ्यांना सहज काढता येणार आहे.