शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 22:23 IST

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा-कुणबी समाजातील मुला-मुलींसाठी वसतिगृहे उभारणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी केली. ते येथील मराठा-कुणबी समाज राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय मेळाव्यात बोलत होते.

ठळक मुद्देरणजित पाटील : पुसद येथील राज्यस्तरीय मेळाव्यात घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा-कुणबी समाजातील मुला-मुलींसाठी वसतिगृहे उभारणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी केली. ते येथील मराठा-कुणबी समाज राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय मेळाव्यात बोलत होते.येथील शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंगच्या प्रांगणात रविवारी पाचवा राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय मेळावा घेण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटक म्हणून बोलताना रणजित पाटील म्हणाले, मराठा समाज हा संवेदनशील आहे. सर्व समाज घटकांना न्याय देणारा आहे. या समाजावर सरस्वती प्रसन्न असून लक्ष्मी रुसलेली आहे. त्यामुळे मराठा समाजाने काळाची पावले ओळखून बदलले पाहिजे, त्यासाठी मेळाव्यांच्या माध्यमातून समाज एकसंघ राहणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भावनाताई गवळी, माजी खासदार सदाशिव ठाकरे, माजी मंत्री सुभाषराव ठाकरे व संजय देशमुख, माजी आमदारद्वय अ‍ॅड. अनंतराव देवसरकर व विजय पाटील चोंढीकर, जीवन पाटील, विठ्ठलराव गावंडे, बाबूराव कदम, महादेव सुपारे, तातू देशमुख, रवींद्र अरगडे, जयवंतराव पाटील, नामदेवराव केशवे, चितांगराव कदम, दिगांबर जगताप, राजू बुटले, संगीता घुईखेडकर, दीपाली जाधव, वर्षा पाटील, कविता मुळे आदी उपस्थित होत्या.एक लाखाची देणगीविधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी समाजाच्या अभ्यासिकेसाठी वैयक्तिक एक लाख रुपये देणगी देण्याची घोषणा केली. माजी आमदार अ‍ॅड. अनंतराव देवसरकर यांनी संभाजीनगरातील पाच हजार स्वेअरफूट जागा समाजाच्या वसतिगृह व अभ्यासिकेसाठी देण्याची जाहीर केले. इतरही मान्यवरांनी यासाठी विविध स्वरूपाच्या देणग्यांची घोषणा केली.

टॅग्स :marathaमराठा