शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालय तोडफोडप्रकरणी मोर्चा

By admin | Updated: October 20, 2015 03:15 IST

येथील महादेव मंदिर मार्गावरील बरलोटा हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी रविवारी सकाळी तोडफोड

यवतमाळ : येथील महादेव मंदिर मार्गावरील बरलोटा हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी रविवारी सकाळी तोडफोड केली. या घटनेचा निषेध म्हणून आयएमए (इंडीयन मेडिकल असोसिएशन) शाखा यवतमाळच्या वतीने चोवीस तास आपली रुग्णालये बंद ठेवून सोमवारी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजा कडूकार व सचिव डॉ. नीलेश येलनारे यांच्या नेतृत्वात निषेध मूक मोर्चा बरलोटा हॉस्पिटल पासून काढण्यात आला. यावेळी डॉक्टरांच्या हातात निषेध फलक होते. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर डॉक्टर मंडळींनी ठिय्या दिला. यावेळी हल्लेखोरांना त्वरित अटक करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टरांची बाजू ऐकूण घेतली. नंतर ही सगळी डॉक्टर मंडळी विश्राम गृह येथे पोहचली. तिथे पालकमंत्री संजय राठोड यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. दिलीप देशमुख, डॉ. राजेंद्र कडूकार, डॉ. सुदर्शन कांबळे, डॉ.टी.सी. राठोड, डॉ.सुनील अग्रवाल, डॉ. सुरेखा ठाकरे, डॉ.अशोक चौधरी यांच्यासह शहरातील २४० डॉक्टर उपस्थित होते. या घटनेच्या निषेधार्थ शहरातील ४० खासगी रुग्णालये आज सकाळी आठ वाजतापासून ते मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे रुग्णांना प्रचंड हाल सहन करावे लागले, तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये या दरम्यान गर्दी वाढली होती. दरम्यान याच प्रकरणात श्रमिक पत्रकार संघानेही विवेक गावंडे यांना बरलोटा हॉस्पिटलमध्ये झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पालकमंत्र्यांना निवेदन दिले. मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची त्यांनी मागणी केली. या प्रकरणात पोलीस एकतर्फी कारवाई करीत असल्याचा आरोप करण्यात आला. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षकांनाही निवेदन सादर करण्यात आले. घटनेचा वृत्तांत पत्रकारांनी अधिकाऱ्यांपुढे मांडला. रुग्णालयाने सादर केलेले सीसीटीव्हीचे फुटेज दिशाभूल करणारे असून पत्रकारांकडचेही फुटेज तपासण्याची विनंती करण्यात आली. सबंधित महिला डॉक्टरवर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह आणि जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी फुटेजच्या तपासणीनंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष नागेश गोरख, सचिव निलेश फाळके, अनिरुद्ध पांडे, दिनेश चोरडिया, गणेश बयस, श्रीकांत राऊत, आनंद कसंबे, कपिल शामकुवर, अमोल शिंदे, नितीन भागवते, संदीप खडेकर, गणेश खडसे, प्रवीण देशमुख, मनोज बावनथडे, दीपक शास्त्री, सतीश येटरे, मयूर वानखडे, धनंजय खारोकर, सूरज पाटील, केशव सवळकर, पवन लताड, मनीष जामदळ यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. (शहर वार्ताहर)पालकमंत्र्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले४विश्रामगृह येथे पत्रकार व डॉक्टर यांचे प्रतिनिधी मंडळ समोरासमोर चर्चेसाठी बोलाविण्यात आले होते. या चर्चेदरम्यान पत्रकारांनी व्हिडिओ क्लिप्स् पालकमंत्र्यांना दाखविली. यावेळी या फुटेजमध्ये पत्रकार मारहाण करताना दिसले नाही. यामुळे पालकमंत्र्यांनी डॉक्टरांना याबाबत जाब विचारला. या प्रकरणात डॉक्टरांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस अधिक्षकांना सुधारित पत्र देण्याचे आश्वासन दिले. मारहाणीमध्ये पत्रकार सहभागी नसल्याचे पत्र डॉक्टर पोलिसांना देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.