शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

नऊ महिन्यांपूर्वीच्या हनी ट्रॅप कारवाईची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2022 05:00 IST

संदेश मानकर (रा. जामनकर नगर) या युवकाने दिल्लीतील डॉक्टरशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री केली. डाॅक्टरला भावनिक आधार देत वेळोवेळी मार्गदर्शन केले. यातून दोघांचे नाते घट्ट झाले. संदेशने बहिणीची अडचण सांगत डॉक्टरकडून एक कोटी ७२ लाख रुपये घेतले. याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे प्राप्त झाली. त्यावरून सायबर सेलने गुन्ह्याचा छडा लावत आरोपी संदेश मानकरला अटक केली. त्याच्या घरून एक कोटी ७२ लाख जप्त केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिल्लीतील डॉक्टरला सोशल मीडियाच्या माध्यमातून एका युवकाने हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढले होते. ही कारवाई ४ नोव्हेंबर २०२१ मध्ये करण्यात आली. यात डॉक्टरला एक कोटी ७२ लाख रुपये पोलिसांनी परत केले. या कारवाईची झाडाझडती अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी गुरुवारी घेतली. सकाळी १० वाजेपासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत चौकशी सुरू होती. संदेश मानकर (रा. जामनकर नगर) या युवकाने दिल्लीतील डॉक्टरशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री केली. डाॅक्टरला भावनिक आधार देत वेळोवेळी मार्गदर्शन केले. यातून दोघांचे नाते घट्ट झाले. संदेशने बहिणीची अडचण सांगत डॉक्टरकडून एक कोटी ७२ लाख रुपये घेतले. याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे प्राप्त झाली. त्यावरून सायबर सेलने गुन्ह्याचा छडा लावत आरोपी संदेश मानकरला अटक केली. त्याच्या घरून एक कोटी ७२ लाख जप्त केले. या गुन्ह्याचा तपास यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केला. जामिनावर बाहेर आल्यानंतर संदेश मानकर याने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. या प्रकरणात पोलीस कारवाईवर संशय व्यक्त करण्यात आला. याची चौकशी करण्यासाठी उपपोलीस महानिरीक्षक गुरुवारी यवतमाळात दाखल झाले. त्यांनी या गुन्ह्यातील तपासाशी निगडित असलेल्या सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाचारण केले. अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले, अवधूतवाडी ठाणेदार मनोज केदारे, लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे, सायबर सेलचे प्रभारी अमोल पुरी यांच्याशी गुन्ह्याबाबत विचारपूस केली. सर्वांचेच जबाब नोंदवून घेतले. नऊ महिन्यांपूर्वीच्या कारवाईची चौकशी लागल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या चौकशीतून काय तथ्य बाहेर येते, याकडे लक्ष लागले आहे. नुकतीच औरंगाबाद आयजींनी भूखंडाच्या प्रकरणात अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. 

मदत पोहोचण्यास विलंबाबाबत नाराजी - जिल्ह्यातील क्विक रिस्पॉन्स सिस्टीम व्यवस्थित काम करीत नसल्याबाबत उपमहानिरीक्षकांनी नाराजी व्यक्त केली. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पोलीस मदत पोहोचण्यास वेळ लागत आहे. यामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश उपमहानिरीक्षकांनी दिले. याशिवाय गुन्ह्यांचा तपास व इतर प्रकरणांच्या संदर्भात उपमहानिरीक्षकांकडून सूचना करण्यात आल्या. 

काही तपासाबाबत तक्रारी होत्या. याचा आढावा घेण्यात आला. शिवाय क्विक रिस्पॉन्स प्रणालीमध्ये जिल्हा माघारला आहे. यात सुधारणा करण्याचेही निर्देश देण्यात आले. - चंद्रकिशोर मीनापोलीस उपमहानिरीक्षक

 

टॅग्स :honeytrapहनीट्रॅप