शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
6
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
7
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
8
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
9
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
10
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
11
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
12
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
13
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
14
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
15
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
16
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
17
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
18
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
19
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
20
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी

पुसद तालुक्यात १३ हजार नागरिकांची घरवापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 5:00 AM

तालुक्यात परजिल्हा व परप्रांतातून परतणाऱ्या सर्व नागरिकांची आरोग्य विभागामार्फत तपासणी करुन त्यांच्या हातावर शिक्के मारुन त्यांना होम क्वारंटाईन शिक्के मारले गेले. सध्या सहा हजार १०१ नागरिक होम क्वारंटाईन असून तब्बल सहा हजार ८४५ जणांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना क्वारंटाईन मुक्त करण्यात आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी टाळेबंदी, मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे, हात स्वच्छ धुणे आदी उपाययोजना केल्या जात आहे.

ठळक मुद्दे६१०१ जण होम क्वारंटाईन : ६८४५ जणांचा कालावधी पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : कोरोनाने थैमान घातल्यामुळे राज्यात २३ मार्चपासून लॉकडाऊन आहे. यामुळे परजिल्हा व परप्रांतात तालुक्यातील नागरिक, कामगार, मजूर, विद्यार्थी, प्रवासी अडकून पडले होते. लॉकडाऊन-४ मध्ये त्यांना शासनाने आपापल्या गावी परतण्याची मुभा दिली. शासनाच्या परवानगीने २५ मे पर्यंत तालुक्यात १२ हजार ९४६ नागरिकांनी घरवापसी केली आहे. यात सहा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना यवतमाळच्या शासकीय महाविद्यालयाच्या कोरोना कक्षात दाखल केले आहे.तालुक्यात परजिल्हा व परप्रांतातून परतणाऱ्या सर्व नागरिकांची आरोग्य विभागामार्फत तपासणी करुन त्यांच्या हातावर शिक्के मारुन त्यांना होम क्वारंटाईन शिक्के मारले गेले. सध्या सहा हजार १०१ नागरिक होम क्वारंटाईन असून तब्बल सहा हजार ८४५ जणांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना क्वारंटाईन मुक्त करण्यात आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी टाळेबंदी, मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे, हात स्वच्छ धुणे आदी उपाययोजना केल्या जात आहे. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व कामकाज पूर्णत: बंद झाल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आदी महानगरात गेलेल्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. अनेकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांनी ‘गड्या आपुला गाव बरा’ म्हणत मिळेल त्या वाहनाने आपले गाव जवळ केले. अनेक जण पायदळ प्रवास करीत गावाकडे परतले.परजिल्हा व परप्रांतात अडकलेले कामगार, मजूर, नोकरदार, विद्यार्थी, प्रवासी आदींनी गावी परतण्याची मुभा मिळाल्यावर आॅनलाईन परवानगी मिळविली व आपले गाव गाठले. तालुक्याच्या १९६ गावांमध्ये २५ मे पर्यंत १२ हजार ९४६ नागरिक परत आले. त्यांची शेंबाळपिंप्री, फेट्रा, बेलोरा, जांब बाजार, चोंढी, गौळ बु. आदी सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांसह एकूण ४७ उपकेंद्रांवर आरोग्य तपासणी करण्यात आली. शहरातील आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणातही तपासणी सकाळी ८ ते १२.३० व दुपारी ४ ते ६ या कालावधीत केली जात आहे. तालुक्यातील आठ जण आत्तापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून यामध्ये हुडी येथील चार तर निंबी येथील चार जणांचा समावेश आहे. प्रशासनाने त्यांच्या संपर्कातील २२ जण सध्या क्वारंटाईन केले. यामध्ये हुडी बु. येथील पाच, निंबी येथील १२ तर कवडीपूर येथील पाच नागरिकांचा समावेश आहे. या २२ जणांमध्ये १३ महिला व नऊ पुरूषांचा समावेश आहे. त्यांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.१५ जणांचे अहवाल आले निगेटीव्हक्वारंटाईन असलेल्या २२ जणांपैकी १५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सात जणांचे रिपोर्ट अप्राप्त असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार यांनी दिली. तूर्तास तालुक्यातील परिस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन, तहसीलदार प्रा. वैशाख वाहुरवाघ, बीडीओ शिवाजी गवई, मुख्याधिकारी निर्मला राशिनकर, ठाणेदार प्रमेश आत्राम, ठाणेदार प्रदीपसिंह परदेशी परिस्थितीवर नजर ठेवून आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या