शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
6
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
7
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
8
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
9
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
10
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
11
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
12
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
13
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
14
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
15
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
16
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
17
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
18
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
19
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
20
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप

होळीला तांड्या-तांड्यात अवतरते गोकूळ

By admin | Updated: March 6, 2015 02:13 IST

होळी आणि धूळवड या सणांना प्रत्येक समाजात वेगवेगळ्या परंपरा आहेत. या परंपरांना आधुनिक ‘टच’ मिळवून आनंदाचे सण काहीसे विकृत होऊ लागले आहेत.

सुनील हिरास दिग्रसहोळी आणि धूळवड या सणांना प्रत्येक समाजात वेगवेगळ्या परंपरा आहेत. या परंपरांना आधुनिक ‘टच’ मिळवून आनंदाचे सण काहीसे विकृत होऊ लागले आहेत. मात्र काही समाजांनी अजूनही सणांची पुरातन परंपरा जपली आहे. बंजारा समाजाने जपलेली होळीची परंपरा त्याचेच एक उदाहरण होय. होळीनंतर ‘लेंगी’ महोत्सव एक सांस्कृतिक पर्वणीच असते. होळीच्या आनंदाची पर्वणी जिल्ह्यातील प्रत्येक तांड्यात व गावातही पाहायला मिळते.मानवी नात्यांची वीण घट्ट करणाऱ्या प्रेम अन् आनंदाची उधळण बंजारा समाज होळीच्या निमित्ताने करीत असतो. म्हणूनच या सणाचे धार्मिक व सामाजिक महत्त्व व अस्सल पण अजूनही टिकून राहिले आहे. बंजाराबहुल असणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याची ही आगळीवेगळी सांस्कृतिक ओळखच म्हणावी लागेल. प्रत्येक गावच्या तांड्यावर होळीचा आनंद अन् उत्साह भरभरून वाहत आहे. होळी हा लोक संस्कृतीचा उत्सव म्हणूनच हा समाज साजरा करीत असतो. तांडा किंवा गाव म्हणजे रंगभूमीच असते आणि या रंगभूमीवर लोककलेचा सुंदर अविष्कार होळीच्या निमित्ताने पाहायला मिळतो. होळीच्या निमित्ताने तांड्यातांड्यात डफडीचा आवाज घुमू लागतो. या डफडीच्या तालावर तांड्यातला प्रत्येक लहान मोठा फेर धरती अन् सुरू होते होळीच्या गाण्यांची समृद्ध परंपरा. होळीची गाणी हे या सणाचे प्रमुख वैशिष्ट्य. बाया-माणसे सारेच ही गाणी मोठ्या आनंदाने सुरेल व एका आवाजात गातात. विशेषत: महिला अशी गाणी गाताना गाण्यांशी एकरूप होवून तन्मयतेने नाचू लागतात. होळीच्या या लोक संस्कृतीच्या प्रवाहात रितीरिवाज तर आहेतच शिवाय त्यात सण, उत्सव, व्रत, खेळ, मनोरंजन, विनोद यांचा अविट मेळ घातला आहे.रातेन काई वात किती ऐ गोरीहाटेन जाऊ तारे वास्तू गोरी ऐकत गोतो मारो लाढो देवरियामाहूरेन गोतो मारी सीता भोजाईया समाजातील गाणी मानव जीवनाच्या जन्मापासून थेट मृत्यूपर्यंत रचली आहेत. ही गीते केवळ गाणी आणि मनोरंजनापुरती मर्यादित नसून त्यात जीवनाचा गहन अर्थही दडला आहे. ‘लेंगी’ महोत्सव हे याचे अधिक चांगले उदाहरण होईल. अमर वेगेर एक चांदा रे सूर्यानव लाख तारा ओरे साथ चलेसोबतेम चले धरती तो परतांड्यातील प्रत्येक घरात आणि घरातल्या प्रत्येकाने होळीचा आनंद घ्यावा याची काळजी तांड्यावरचे नायक, कारभारी घेत असतात. होळीच्या उत्सव पाच दिवसांचा असला तरी त्यातील पाल, फाग आणि गेद महत्त्वाचे मानले जातात. बंजारा महिला-पुरुष आपल्या पारंपरिक वेशभूषेत लेंगी गीत म्हणतात. गोलाकार वर्तुळाकार नाचत हा उत्सव बेभान होवून आनंदाला वाट करून देतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी फाग मागण्याची परंपरा आहे.