लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दीडशे किलोमीटरचा प्रवास. दोन दिवसांचा मुक्काम. अर्ध्याच कापसाची खरेदी. अर्धा कापूस वापस, यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने शुक्रवारी कापसाची गाडी येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात नेऊन आपला संताप व्यक्त केला. नेर तालुक्याच्या अडगाव खाकी येथील शेतकऱ्याच्या या भूमिकेने खळबळ उडाली.आडगाव खाकी येथील शेतकरी प्रदीप प्रल्हाद साबळे यांनी पणनकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी केली होती. लगतचे केंद्र हाऊसफुल्ल झाले. यामुळे साबळे यांची कापूसगाडी वणी येथील सीसीआयच्या केंद्राकडे पाठविण्यात आली. या ठिकाणी दोन त्यांचा दोन दिवस मुक्काम घडला. नंबर लागल्यानंतर अर्धाच कापूस खरेदी करण्यात आला. अर्धा कापूस नाकारला. यामुळे सदर शेतकऱ्याने यवतमाळ येथील सहकार विभागाच्या कार्यालयात कापूस रिकामा करण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांच्या मध्यस्थितने गुंता सोडविण्यात आला. पणनच्या यवतमाळ खरेदी केंद्रात कापूस रिकामा करण्यात आला.प्रदीप प्रल्हाद साबळे यांनी २५ क्विंटल कापूस विक्रीसाठी नेला होता. वणी केंद्रात अर्धीगाडी रिकामी झाली. उर्वरित कापूस मोजण्यासाठी पैशाची मागणी झाल्याचा आरोप करण्यात आला. पणनने साबळे यांचा कापूस खरेदी केला. सीसीआयने अर्धा कापूस का नाकारला, हा प्रश्न याठिकाणी उपस्थित केला जात आहे. त्यामुळे साबळे यांनी केलेल्या पैसे मागणीच्या आरोपाला बळ मिळाले आहे. यात मात्र त्यांना मोठा त्रास झाला.शेतकऱ्याला गाडीभाड्याचा नऊ हजार रुपये भुर्दंडवणी ते नेर हा प्रवास लांब पल्ल्याचा आहे. जवळचे केंद्र असताना दूर कापूस विक्रीची शिक्षा या शेतकºयाला झाली. त्याला सात हजार रुपये गाडीभाडे आणि दोन हजारांचा नाईट चार्ज लागला. शिळे अन्न खावून रात्र काढावी लागली. सहकार विभागात कापूस आणला त्यावेळी शेतकरी नेते देवानंद पवार, माजी समाजकल्याण सभापती राजेंद्र हेंडवे, घनशाम अत्रे, प्रदीप डंभारे, अरुण ठाकूर, जितेश नवाडे, चंदू नंदेश्वर आदी उपस्थित होते.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST
आडगाव खाकी येथील शेतकरी प्रदीप प्रल्हाद साबळे यांनी पणनकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी केली होती. लगतचे केंद्र हाऊसफुल्ल झाले. यामुळे साबळे यांची कापूसगाडी वणी येथील सीसीआयच्या केंद्राकडे पाठविण्यात आली. या ठिकाणी दोन त्यांचा दोन दिवस मुक्काम घडला. नंबर लागल्यानंतर अर्धाच कापूस खरेदी करण्यात आला.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर धडक
ठळक मुद्देअर्धाच कापूस खरेदी : शेतकरी संतप्त, पैशांच्या मागणीचा आरोप