शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
4
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
5
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
6
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
7
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
8
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
9
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
11
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
12
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
13
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
14
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
15
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
16
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
17
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
18
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
19
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
20
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी-मराठी गीतांची मेजवाणी

By admin | Updated: January 25, 2016 03:47 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना

यवतमाळ : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याच्या हेतूने संगीत क्षेत्रातील दिग्गज कलावंतांचा ‘स्वरांजली’ हा हिंदी-मराठी सुमधूर गीतांचा कार्यक्रम समता मैदानात शनिवार, २३ जानेवारीला आयोजित करण्यात आला होता.दीप प्रज्वलनानंतर पं.सुरेश वाडकर यांनी प्रारंभी ‘ओंकार स्वरूप, सद्गुरू समर्था’ हे भक्तिगीत सादर करून दमदार सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सलगपणे ‘फिर कुछ नही भाता, जब प्रेम रोग लग जाता’, ‘और इस दिल मे क्या रखा है, ये तेरा ही दर्द छुपा रखा है’ आणि ‘लगी आज सावन की फिर ओ झडी है’ ही गाणी सादर करून हवेतील गारवा पळवून लावला. त्यानंतर आघाडीचा गायक आणि पंडितजींचा शिष्य स्वप्नील बांदोडकर यांनी तरुणांना डोलायला लावले. टाईमपास चित्रपटातील ‘मला वेड लागले प्रेमाचे’ या गाण्यापासून ‘जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू’ ‘राधा ही बावरी’ ‘शिवसेना गीत’ गाऊन प्रचंड ऊर्जा निर्माण केली. पंडितजींचे दुसरे शिष्य अमेय दाते यांनी विठ्ठल माऊलींचे स्मरण करून देवा श्री गणेशाला वंदन केले. ‘मोहब्बत बरसा देना तू, सावन आया है’ ही सर्वांगसुंदर गाणी म्हणून रसिकांना डोलायला लावले.संगीताची साधक साधना सरगम यांनी त्यांचे अत्यंत आवडते गाणे ‘निले-निले अंबर पर, चांद जब आये’ ने श्रोत्यांना जिंकून घेतले. गाण्यांचा गुलदस्ता सादर करताना ‘हर किसी को नही मिलता यहां प्यार जिंदगी मे’ ‘सात समंदर पार मै तेरे पिछे पिछे आ गयी’ ही अजरामर गाणी सादर केली. सुरेश वाडकर आणि साधना यांनी द्वंद्वगीतेही सादर केली. ‘मै तुझे कल भी प्यार करता था, मै तुझे अब भी प्यार करता हू’ ‘तुझ्या माझ्या संसाराला आणिक काय हवं’ ‘तुमसे मिलके ऐसा लगा’ या गाण्यांवर अनेकांना ठेका धरला.सूत्रसंचालन अभिजित खांडकेकर यांनी पंडितजींना बाळासाहेबांच्या काही आठवणी सांगण्याचा आग्रह केला, तेव्हा ते म्हणाले ‘बाळासाहेबांनी माझ्यावर मुलासारखे प्रेम केले. त्यांच्याशी आमचे घरगुती संबंध होते. त्यांच्या छत्रसायेतच आम्ही वाढलो. बळीराजांच्या प्रेमाखातर मी या कार्यक्रमासाठी आलो आहे व कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर आणि अमेय दाते यांनी संयुक्तपणे ‘रात के ढाई बजे, कोई शहनाई बजे’ ‘सपने मे मिलती हैं, वो कुडी मेरी सपने मे मिलती हैं’ ‘चप्पा चप्पा चरखा चले’ अशी लोकप्रिय गाणी सादर करून वातावरणात आनंदाची पेरणी केली. पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, जिल्हा प्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर, संतोष ढवळे, प्रवीण पांडे, सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. थंडी असूनही दिग्गज कलावंतांना प्रत्यक्ष पाहता-पाहता त्यांना ऐकण्याची पर्वणी साधण्यासाठी समता मैदान खचाखच भरले होते. (सांस्कृतिक प्रतिनिधी)