शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

यवतमाळ जिल्ह्यात पावसाचे थैमान; पाच तालुक्यात अतिवृष्टी, पुराच्या पाण्यात मुलगा वाहून गेला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 12:06 IST

सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ६१.२ मिमी पाऊस झाला असून यवतमाळसह पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.

ठळक मुद्देअनेक वाड्या-वस्त्यांना पुराचा वेढा : बेंबळा प्रकल्पाचे १८ दरवाजे उघडले 

यवतमाळ : रविवारी रात्री ८ वाजता सुरू झालेला पाऊस सोमवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत सुरूच असल्याने यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांपुढे पुराचा धोका निर्माण झाला आहे. बाभूळगावात अनेक ठिकाणी पूरपस्थिती असून तेथील मस्जीद परिरसातील नदी काठची घरी पाण्याने वेढली आहे. तालुक्यातील किन्ही व गोंधळी या गावांनाही पुराचा वेढा पडला असून धामणगाव रस्त्यावरील सिद्धेश्वर मंदिर पाण्याखाली गेल्याने तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर, यवतमाळमध्ये कॉलनीत आलेला पूर पहायला गेलेला एक मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेला. दरम्यान सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ६१.२ मिमी पाऊस झाला असून यवतमाळसह पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.

रविवारी सायंकाळपासून यवतमाळसह जिल्ह्यात रिमझीम पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस अधूनमधून सुरू असतानाच रात्री १० नंतर पावसाने जोर पकडला. सोमवारी सकाळी ११.३० पर्यंत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरुच होता. बाभूळगाव शहरालगतच्या उंच पुलावरून पुराचे पाणी वाहत असून बाभूळगाव येथील मस्जीद परिसरातील नदी काठची घरे पुराने वेढली आहे. बाभूळगावातील गोरक्षणातील गाईच्या गोठाही पुराच्या पाण्यात सापडला आहे.

राळेगाव तालुक्यातील रामतीर्थ येथील वर्धा नदीवर बांधलेल्या पुलावरूनही पाणी वाहू लागले आहे. अपर वर्धा प्रकल्पाचे सर्व १३ दरवाजे पहाटे ५ वाजता १५० सेमीने उचलून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने बाभूळगावसह कळंब, राळेगाव, मारेगाव आणि वणी तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राळेगाव तालुक्यातील अनेक गावे पुराने वेढली अूसन सावनेर येथील दहा घरे पुरामध्ये वाहून गेली.  झाडगावसह सावंगीसमोर पुराचा धोका असून तालुक्यातील चहांद आणि करंजी गावांचा संपर्क तुटला आहे. पिंपळगावातील काही घरात पाणी शिरले असून वडकी, फुटाणे ले-आऊटमध्येही पूरस्थिती आहे. मध्यम प्रकल्पाच्या पाण्यामुळे वरुड जहांगीर येथील बंजारा वस्तीत पाणी शिरले आहे.

राळेगावमध्ये १४७ तर कळंबमध्ये १३० मिमी पाऊस

रविवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्यातील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात राळेगाव तालुक्यात १४७.९ मिमी पाऊस झाला आहे. कळंब तालुक्यालाही पावसाने झोडपले असून येथे १३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. बाभूळगाव तालुक्यात १०३.४ मिमी, नेर १०३.१ मिमी तर यवतमाळ तालुक्यात ७० मिमी पाऊस झाला असून सोमवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम असल्याची स्थिती आहे.

उपकेंद्र पाण्यात; राळेगाव तालुक्यातील १६ गावे अंधारातराळेगाव तालुक्यात रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून झाडगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रात पाणी शिरले आहे. त्यामुळे येथील डीसी पुरवठा थांबविण्यात आला असून सर्व ३३ केव्ही व ११ केव्ही फिडरवरून होणारा वीज पुरवठाही थांबविण्यात आला आहे. सदर उपकेंद्रातून १६ गावांना वीज पुरवठा केला जातो. ही १६ ही गावे सध्या अंधारात असून पूरस्थिती ओसरल्यानंतर नुकसानीची माहिती घेवूनच विद्युत पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे राळेगावच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.वरुड, जहांगीर तांड्यावरील नागरिकांनी गाठली टेकडी 

रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वरुड, जहांगीर येथील तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठा वाढला आहे. तलाव ओव्हर फ्लो होवून नुकसान होण्याच्या भीतीने वरुड, जहांगीर तांड्यातील नागरिकांनी घराला कुलूपे ठोकून वरच्या बाजूला असलेल्या टेकडीचा आसरा घेतला आहे. पुराच्या भीतीमुळे लेकरां-बाळांसह ही कुटुंबे पहाटेपासून उपाशीच टेकडीवर बसून असल्याचे वार्ताहरांनी कळविले आहे.

कॉलनीत आलेला पूर पाहताना मुलगा वाहून गेला 

यवतमाळ शहरातील मुलकी परिसरात मुसळधार पावसामुळे  नाल्यांना पूर आला. पूर बघण्यासाठी जय गायकवाड (रा. मुंगसाजी नगर वडगाव आर्णी रोड) हा मित्रांसोबत गेला, सकाळी नाल्यात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरYavatmalयवतमाळ