शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा; ५५ मंडळात ६५ मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद

By विशाल सोनटक्के | Updated: July 13, 2022 15:18 IST

जोराच्या पावसामुळे अमरखेड, महागावसह राळेगाव तालुक्यात काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली असून महागाव तालुक्यातील शिरफुल्लीसह राहूर गावाला पुराचा वेढा पडला आहे. 

ठळक मुद्दे२४ तासात ६९.७ मिमी पाऊस

यवतमाळ : मागील सहा दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. मंगळवारी दिवसभर अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळल्यानंतर मध्यरात्री पावसाने आणखी जोर धरला. हा पाऊस पहाटेपर्यंत सर्वदूर कोसळत होता. यंदा प्रथमच संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून २४ तासात तब्बल ६९.७ मिमी पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे शंभरपैकी ५५ मंडळात अतिवृष्टी नोंदविली गेली आहे.

यवतमाळ तालुक्यात सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात ४७.८ मिमी पाऊस झाला आहे. बाभूळगाव ५१.३, कळंब ५१.२, दारव्हा ६३.३, दिग्रस ५४.२, आर्णी ७५.४, नेर ४७.२, पुसद ६५.५, उमरखेड १३२.३, घाटंजी ४०.१, राळेगाव ६३.५, महागाव १०९.१, वणी ७८.६, मारेगाव ४९.२, केळापूर ८६.७ तर झरी जामणी तालुक्यात सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात तब्बल १०५.५ मिमी इतका विक्रमी पाऊस झाला आहे. जोराच्या पावसामुळे अमरखेड, महागावसह राळेगाव तालुक्यात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून महागाव तालुक्यातील शिरफुल्लीसह राहूर गावाला पुराचा वेढा पडला आहे. 

बेंबळासह सायखेडा, अधरपूसमधूनही पाण्याचा विसर्ग

मंगळवारी दिवसभर जिल्हाभरात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर रात्रीही पावसाचा जोर कायम राहिल्याने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पात मोठा पाणीसाठा जमा झाला आहे. धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने बेंबळासह सायखेडा आणि अधरपूस प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बेंबळा प्रकल्पात बुधवारी सकाळी ४६.५२ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून ५० घनसेमीने पाणी सोडण्यात येत आहे. तर सायखेडा प्रकल्प १०० टक्के भरला असून या प्रकल्पातून ६९.३८ घनसेमीने पाणी सोडण्यात येत आहे. अधरपूस प्रकल्पातही ५९.५९ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून या प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून ५० घनसेमीने पाणी सोडण्यात आले आहे. प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

दराटी, पिरंजी व तरोडा लघु प्रकल्प तुडुंब

जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढत आहे. पाटबंधारे उपविभाग क्र. ४ महागाव यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी ३ वाजता दराटी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. तर मंगळवारी सायंकाळी ७ वाजता पिरंजी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. तरोडा प्रकल्पही शंभर टक्के भरला असून या तीनही प्रकल्पातून सांडवा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बुधवारी दराटी लघु प्रकल्पातून १५ सेमीने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. तर पिरंजीमधून १० आणि तरोडा प्रकल्पातून ५ सेमीने सांडवा विसर्ग सुरू होता.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरYavatmalयवतमाळ