शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

‘तो’ दारूगोळा पुरला ठाण्याच्या आवारातच

By admin | Updated: January 3, 2015 02:06 IST

लष्करी बनावटीशी साधर्म्य असलेला घातक दारूगोळा आर्णीच्या अरुणावती नदीच्या पात्रात एका बेवारस पेटीत आढळून आला होता.

यवतमाळ : लष्करी बनावटीशी साधर्म्य असलेला घातक दारूगोळा आर्णीच्या अरुणावती नदीच्या पात्रात एका बेवारस पेटीत आढळून आला होता. त्यातील हॅँडग्रेनेड (बॉम्ब) आणि काडतुस जीवंत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस ठाण्याच्या आवारातच बॉम्ब शोधक-नाशक पथकाच्या शास्त्रीय पद्धतीने पुरण्यात आले. याला सुरक्षेचे कारण असले तरी कर्मचाऱ्यांमध्ये बॉम्बची भीती निर्माण झाली आहे. आर्णी येथील अरुणावती नदीच्या पात्रात एका पेटीत लष्करी बनावटीशी साधर्म्य असलेले तीन हॅन्ड ग्रेनेड (बॉम्ब), एके-४७ रायफलमध्ये उपयोगात येणारे २६ काडतूस आणि ९ एमएम विदेशी पिस्तुलात वापरले जाणारे तीन काडतूस असा घातक दारूगोळा आढळून आला होता. या प्रकाराने एकच एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी हा सर्व दारूगोळा जप्त केला. तो १९६० पूर्वीचा असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या दारुगोळ््याचे काय करावे असा प्रश्न पोलिसांपुढे आहे. त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया केली जात आहे. असे असले तरी हा दारूगोळा ठाण्याच्या मालखान्यात ठेवता येत नाही. विस्फोटक पदार्थ आणि वस्तू ठेवण्याची शास्त्रीय पद्धत आहे. त्यानुसार सुरक्षेच्या कारणास्तव बॉम्ब शोधक-नाशक पथकाच्या मदतीने एका खड्ड्यात खालून आणि वरून दोन वाळूच्या पिशव्यांमध्ये हा दारूगोळा सुरक्षितरीत्या पुरण्यात आला. आता या विस्फोटकाचा कुठलाही धोका राहिला नसल्याचे पोलिसातून सांगण्यात येते. मात्र बॉम्ब फुटेल या भीतीने अनेक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (स्थानिक प्रतिनिधी)