शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चांगले व्यवहार ठेवले, म्हणजे गुन्हा केला काय? आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा शेवटचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 10:04 IST

‘आतापर्यंत बँके बरोबर रेग्यूलर व्यवहार केल्याने मी कर्जमुक्तीमध्ये बसलो नाही, व्यवहार चांगले ठेवणे म्हणजे गुन्हा केला काय ?, हेच कळत नाही, बँकेतून दररोज फोन येतात, त्यांना तोंड दाखवायला जागा नाही’ अशा शब्दात सरकारच्या कर्जमाफीला सणसणीत चपराक लावणारी चिठ्ठी सोयजनाच्या ज्ञानेश्वर मिसाळ या शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिली.

ठळक मुद्देमृत्यूपूर्व चिठ्ठी कर्जमाफीस अपात्र ठरल्याची खंत

सुरेंद्र राऊत ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : ‘आतापर्यंत बँके बरोबर रेग्यूलर व्यवहार केल्याने मी कर्जमुक्तीमध्ये बसलो नाही, व्यवहार चांगले ठेवणे म्हणजे गुन्हा केला काय ?, हेच कळत नाही, बँकेतून दररोज फोन येतात, त्यांना तोंड दाखवायला जागा नाही’ अशा शब्दात सरकारच्या कर्जमाफीला सणसणीत चपराक लावणारी चिठ्ठी सोयजनाच्या ज्ञानेश्वर मिसाळ या शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिली. त्याच्या चिठ्ठीतील प्रत्येक शब्दातून शेतकऱ्याची आजची अवस्था आणि शासनाची धोरणे स्पष्ट होते. शेतकरी मृत्यूला का कवटाळतो, याचे उत्तरही शोधण्याचा प्रयत्न आपल्या चिठ्ठीत केला आहे.यवतमाळच्या भारत लॉजमध्ये बुधवारी ज्ञानेश्वर मिसाळ (५६) रा. सोयजना ता. मानोरा (जि. वाशिम) या शेतकºयाने विषप्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी ज्ञानेश्वरने वेगवेगळ्या चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. शासनाचे धोरण, मुलाला जगण्याचा सल्ला आणि सोबत बँकेच्या कर्जाचे स्टेटमेंटही जोडलेले आहेत. ज्ञानेश्वर हा आठ एकर शेती कसणारा शेतकरी. प्रामाणिकपणे कष्ट करून आयुष्यभर स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न केला. परंतु निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाच्या धोरणाने त्यालाही विषाचा घोट घेणे भाग पडले. आपल्यावर ही वेळ का आली याचा लेखाजोखा त्याने चिठ्ठीत मांडला आहे. ज्ञानेश्वर म्हणतो, ‘माझ्या शेतात संत्र्याची ४०० झाडे होती. २०० झाडे वाळली. मी बेनार आॅफीसला कळविले. नुकसानभरपाई मिळाली नाही. शेतातही भेट दिली नाही. मी आयसीआयसीआय बँकेकडे कर्जाची मागणी केली. ते देण्यास तयार झाले. इतर बँकेचे पैसे भरा, नीलचा दाखला आणा, असे सांगितले. माझ्याकडे असलेले ग्रामीण बँकेचे एक लाख आठ हजार रुपये भरले, त्यासाठी १२ टक्के व्याजाने सावरकारी कर्ज घेतले. आयसीआयसीआय बँकेचे तीन लाख ६८ हजार रुपये कर्ज आहे. एडीसीसी बँकेचे ७८ हजार रुपये कर्ज आहे. आतापर्यंत बँकेबरोबर रेग्युलर व्यवहार केल्यामुळे मी कर्जमुक्तीमध्ये बसलो नाही. असे चिठ्ठीत लिहिले आहे.

मुलाला दिला जगण्याचा सल्लाज्ञानेश्वर मिसाळ याने आपल्या सतीश व सागर या मुलांच्या नावे लिहिलेल्या चिठ्ठीत जगण्याचा मूलमंत्र दिला. माणूस कितीही मोठा असला तरी पैसा नसेल तर तो कवडीमोल ठरतो. कर्जबाजारी माणसावर कुणी विश्वास ठेवत नाही. माझ्यासोबत जो अनर्थ घडला असा कुणावरही येऊ नये. कोणाचाही पैसा बुडवू नका, व्यवहार चांगले ठेवा, काटकसरीने वागा, आयुष्यात कुणालाही पैसे मागण्याची वेळ येऊ देऊ नका, असा सल्ला मुलाला दिला.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या