यवतमाळ : लगतच्या मोहा येथील संत भगवान बाबा मंदिरात ६ ते १३ जानेवारीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. श्री संत भगवान बाबा व श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताह घेण्यात येत आहे. ६ रोजी ह.भ.प. प्रभूदास महाराज शिरभाते यांच्या हस्ते वीणा उभारणे आणि कलश स्थापना होईल. ६ ते १२ जानेवारीपर्यंत ह.भ.प. नितीन महाराज परभणे, ह.भ.प. विशाल महाराज बडे, ह.भ.प. शेख महीबुब महाराज, ह.भ.प. कल्याण महाराज सावळे, ह.भ.प. नवनाथ महाराज शेळके, ह.भ.प. प्रभूदास महाराज शिरभाते, ह.भ.प. लक्ष्मण महाराज फड यांचे कीर्तन होईल. मंगळवार १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ह.भ.प. लक्ष्मण महाराज फड यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. दुपारी १ ते ६ यावेळात महाप्रसाद होणार आहे. शिवाय दररोज काकड आरती, भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, हरिकीर्तन होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याची विनंती करण्यात आली आहे. (वार्ताहर)
मोहा येथे हरिनाम सप्ताह
By admin | Updated: December 31, 2014 23:32 IST