शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

यवतमाळात ‘चक्रीधरणे’त शेतकऱ्यांनी केले अर्धनग्न आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 11:40 IST

शासनाच्या नाकर्तेपणाने देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांनी यवतमाळात पाच दिवसांपासून चक्रीधरणे आंदोलन सुरू केले. मंगळवारी शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला.

ठळक मुद्देकाँग्रेस खासदारांचे नेतृत्व पाच दिवसांपासून शासनाविरोधी एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाच्या नाकर्तेपणाने देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांनी यवतमाळात पाच दिवसांपासून चक्रीधरणे आंदोलन सुरू केले. मंगळवारी शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला. दररोज अभिनव पद्धतीने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे नेतृत्व मंगळवारी हिंगोलीचे खासदार अ‍ॅड. राजीव सातव यांनी केले.शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात यवतमाळच्या तिरंगा चौकात शुक्रवारपासून शेतकऱ्यांनी शासनविरोधात एल्गार पुकारला आहे. दररोज एका विधानसभा क्षेत्रातील शेतकरी तिरंगा चौकात एकत्र येऊन आंदोलन करीत आहे. मंगळवारी उमरखेड विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. शासनाने शेतकऱ्यांना तसेही अर्धनग्न केले आहे. उद्धस्त झालेल्या या शेतकऱ्यांनी शर्ट आणि बनियान काढून केवळ पँट घालून हे आंदोलन केले. यावेळी खासदार राजीव सातव, माजी आमदार विजय खडसे, तातू देशमुख, काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे गटनेते राम देवसरकर, शेतकरी संघर्ष समितीचे प्रवीण देशमुख, अरूण राऊत, अशोक बोबडे, अनिल गायकवाड, अशोक भुतडा, शिवाजी सवनेकर, अविनाश काकडे, दिनेश गोगरकर, रमेश चव्हाण, नंदु अग्रवाल, सलीम सिद्धीकी, शैलेश कोपरकर, सोनू खातीब, शैलेश अनखुळे, बाबू दुर्गमवार, स्वप्नील नाईक, बालाजी आगलावे, अरविंद माने आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.शिवसेना-भाजपा युती सरकार शेतकरी विरोधी आहे. या सरकारने शेतकऱ्यांना पोत्यावर आणले, असे म्हणत आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांनी अंगात पोत्यांचा सदरा घालून आणि गळ्यात अळीग्रस्त बोंडांच्या माळा घातल्या. हातात बेशरमचे झाड उंचावून सरकारचा निषेध केला.दुसऱ्या दिवशी रक्तदान शिबिर आंदोलन घेण्यात आले. सरकारच्या अंगात शेतकऱ्यांचे रक्त नाही. त्यामुळे रक्तदानाच्या माध्यमातून सरकारच्या अंगात शेतकऱ्यांचे रक्त संचारावे आणि शेतकरी मदतीची भावना निर्माण व्हावी, ही यामागची भूमिका होती. तिसऱ्या दिवशी मुंडण करून शासनाचा निषेध केला, तर चौथ्या दिवशी जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांनी शासनविरोधी टाहो फोडला. गत पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची अद्याप शासनाने दखल घेतली गेली नाही. त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र करून राज्यभर पोहोचविण्याचा निर्धार शेतकरी संघर्ष समितीने केला.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी