शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आता प्रत्येक शाळेत गुरुजी होणार डाॅक्टर; विद्यार्थ्यांचा ताप किती, हेही रोज तपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 05:00 IST

४ ऑक्टोबरपासून शहरी भागातील आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू केले जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याचे आदेश आहे. बहुतांश शिक्षकांच्या यापूर्वीच आरटीपीसीआर चाचण्याही आटोपलेल्या आहेत. तरीही शाळांमध्ये शारीरिक अंतर, मास्क व अन्य नियमावली पाळली जाणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील तब्बल तीन हजार शाळा जवळपास १८ महिन्यांच्या दीर्घ खंडानंतर सोमवारपासून पुन्हा गजबजणार आहे. मात्र कोरोनाच्या काळजीपोटी राज्य शासनाने प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे गुरुजींना आता दररोज विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान मोजण्यासह डाॅक्टरसारखी काळजी घ्यावी लागणार आहे. ४ ऑक्टोबरपासून शहरी भागातील आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू केले जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याचे आदेश आहे. बहुतांश शिक्षकांच्या यापूर्वीच आरटीपीसीआर चाचण्याही आटोपलेल्या आहेत. तरीही शाळांमध्ये शारीरिक अंतर, मास्क व अन्य नियमावली पाळली जाणार आहे. 

हेल्थ क्लिनिकमध्ये  काय काय राहणार ? - शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू करून पल्स ऑक्सीमीटर, थर्मामीटर, सॅनिटायझर, मास्क शाळांनी उपलब्ध करून घ्यायचे आहे. - त्या आधारे विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान नियमित तपासावे, सर्व शाळा जवळच्या आरोग्य केंद्राशी संलग्न करण्याचे निर्देश आहे. - या कामासाठी इच्छुक डाॅक्टर पालकांची मदत घेता येईल, आरोग्य केंद्रातील डाॅक्टर, परिचारिकांचीही मदत घेता येणार आहे. 

शिक्षकांची जबाबदारी वाढणार - हेल्थ क्लिनिकच्या निमित्ताने प्रत्येक शिक्षकाची जबाबदारी वाढणार आहे.  - नियमित अध्यापनासोबतच आरोग्य तपासणीचेही काम त्यांना करावे लागणार आहे.  - सोशल डिस्टन्स पाळण्याबाबत शिक्षकांना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. 

हेल्थ क्लिनिकचा खर्च कोण करणार ? n शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू करण्यासाठी बरेच साहित्य लागणार आहे. मात्र हा खर्च देण्यासाठी शासन तत्पर नाही. उलट शाळांनीच लोकवर्गणीतून हा खर्च भागवावा, अशी मल्लीनाथी शासनाकडून करण्यात आली.  

शिक्षक काय म्हणतात...

शाळा सुरू होत असल्याने आम्हाला आनंदच आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सर्वतोपरी काळजी घेऊच. मात्र साधन सामुग्री खरेदीकरिता शासनाने निधी देणे आवश्यक होते.- राजेंद्र वाघमारेमुख्याध्यापक, दिग्रस 

आम्ही शाळा स्वच्छ केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेऊ. शाळेत आनंददायक वातावरण ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न आहे. मात्र खर्चा भार शासनाने उचलावा. - संजय चुनारकरतंत्रस्नेही शिक्षक 

 

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षक