शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षानंतर बदलणार गुरुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2022 05:00 IST

ग्रामविकास मंत्रालयाने शिक्षकांच्या बदल्यांसाठी स्वतंत्र एजन्सी स्थापन केली आहे. त्यांनी एक स्वतंत्र ॲप तयार केले आहे. ऑनलाईन स्वरूपाच्या बदल्यांसाठी त्याचा वापर होणार आहे. यामध्ये बदलीस पात्र शिक्षकाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळणार आहे. एका शिक्षकाला बदलीसाठी ३० गावांची नावे नोंदविता येणार आहेत. या ठिकाणी जागा रिक्त नसेल तर इतर ठिकाणच्या गावासाठी शिक्षकांची बदली होणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शैक्षणिक सत्राला विलंब असला तरी तत्पूर्वी शिक्षकांच्या बदल्या करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतर जिल्हा बदल्यांबाबत धोरण जाहीर करण्यात आले आहे. या वेळेच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. त्यासाठी बदलीस पात्र शिक्षकाला युजर आयडी आणि पासवर्ड त्याच्या मोबाईल क्रमांकावरच प्राप्त होणार आहे. यामुळे बदल्यांमधील हस्तक्षेप पूर्णत: थांबणार आहे. ग्रामविकास मंत्रालयाने शिक्षकांच्या बदल्यांसाठी स्वतंत्र एजन्सी स्थापन केली आहे. त्यांनी एक स्वतंत्र ॲप तयार केले आहे. ऑनलाईन स्वरूपाच्या बदल्यांसाठी त्याचा वापर होणार आहे. यामध्ये बदलीस पात्र शिक्षकाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळणार आहे. एका शिक्षकाला बदलीसाठी ३० गावांची नावे नोंदविता येणार आहेत. या ठिकाणी जागा रिक्त नसेल तर इतर ठिकाणच्या गावासाठी शिक्षकांची बदली होणार आहे. शिक्षकांच्या बदलीसाठी पाच वर्षाचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला आहे. एका ठिकाणी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ नोकरी केली असेल तर असे शिक्षक बदलीस पात्र ठरणार आहेत. जिल्ह्यातील सहा हजार ६०१ शिक्षकांची संपूर्ण माहिती शिक्षण विभागाने ग्रामविकास विभागाकडे पाठविली आहे. यामध्ये निकषात बसणारे शिक्षक यावर्षीच्या बदली प्रक्रियेत असतील. सेवाज्येष्ठता आणि संवर्गनिहाय या निकषाच्या सोबतच किती वर्षे नोकरी केली. यावर बदल्या निश्चित होणार आहेत. पूर्वी बदल्यांसाठी ३० मे ही तारीख देण्यात आली होती. आता याची मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. शाळांची आणि शिक्षकांची माहिती वरिष्ठ कार्यालयांकडे पाठविण्यात आली आहे. अवघड क्षेत्र किती याची माहिती आणि रिक्त पदांची माहिती गुलदस्त्यात आहेत. 

हस्तक्षेप बाद होणार - ऑनलाईन पद्धतीमुळे कुणालाही बदलीसाठी हस्तक्षेप करता येणार नाही. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्याने पारदर्शक पद्धतीने बदल्यांची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे विविध प्रकारच्या शिफारसींना ब्रेक लागेल. 

यावर्षीच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहेत. त्यासाठी संपूर्ण माहिती शिक्षण विभागाने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविली आहे. नियमानुसार सूचना येतील, त्या पद्धतीने बदल्यांची प्रक्रिया राबविली जाणार आहे. - प्रमोद सूर्यवंशीशिक्षणाधिकारी, यवतमाळ.

 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक