शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गुंजचे वीज केंद्र वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 21:51 IST

येथील १३२ केव्ही आणि ३३ केव्हीचे वीज उपकेंद्र रामभरोसे सुरू आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे असल्याने ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देवीज ग्राहक त्रस्त : एका दिवसातच जळत आहे ट्रान्सफार्मर

उत्तम चिंचोळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगुंज : येथील १३२ केव्ही आणि ३३ केव्हीचे वीज उपकेंद्र रामभरोसे सुरू आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे असल्याने ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रमाण वाढले आहे.गुंज येथे ३३ केव्ही वीज उपकेंद्र होते. त्यावेळी कर्मचाऱ्यांसाठी क्वॉर्टरची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर १३२ केव्हीचे वीज उपकेंद्र मंजूर झाले. त्याच्या निर्मितीसाठी जागा अपुरी पडत असल्याने कर्मचाऱ्यांचे क्वॉर्टर पाडून नवीन उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली. परिणामी कनिष्ठ अभियंता व कर्मचारी येथे किरायाच्या खोलीत राहात होते. मात्र आता कनिष्ठ अभियंता थेट यवतमाळ येथून ये-जा करतात. लाईनमन व इतर कर्मचारीही मुख्यालयी राहात नाही.वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी येथे कुणीही भेटत नाही. वरिष्ठांकडे तक्रार करूनही उपयोग होत नाही. या केंद्रात अधिकारी, कर्मचारी राहात नसल्याने वीज चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा परिणाम ट्रान्सफार्मरवर होत आहे. एका दिवसात ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रमाण वाढले आहे. गुंज परिसरात गुंज, माळकिन्ही, सारकिन्ही येथील ट्रान्सफार्मर जहाले आहे. विशेष म्हणजे एकच ट्रान्सफार्मर पाचवेळा जळाले. माळकिन्ही येथील ट्रान्सफार्मर दोनदा तर पेट्रोलपंपाजवळील ट्रान्सफार्मर तीनदा जळाले. नवीन ट्रान्सफार्मर एक दिवस चालल्यानंतर लगच जळतो. यामुळे ग्राहक त्रस्त झाले. महावितरणप्रती प्रचंड असंतोष खदखदत आहे.कंपनीसोबत साटेलोटेएकाच दिवसात ट्रान्सफार्मर जळत असल्याने वीज वितरणचे ट्रान्सफार्मर दुरुस्ती करणाºया कंपनीशी साटेलोटे असल्याचा आरोप होत आहे. दुरुस्त करून आणलेले ट्रान्सफार्मर सुरू करताच दोन तासात जळाले. यामुळे ही शंका बळावली आहे. यात वीज वितरण कंपनीचेही नुकसान होत आहे. ग्राहकांना अंधारात राहावे लागत आहे. वरिष्ठांनी ट्रान्सफार्मर दुरुस्ती करणाऱ्या कंपनीवर कारवाई करून झालेला भुर्दंड त्यांच्याकडून वसूल करावा, अशी मागणी होत आहे. तसेच मुख्यालयी न राहणाऱ्या कनिष्ठ अभियंता व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी आहे.

टॅग्स :electricityवीज