शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

केंद्रीय समितीने जाणल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:35 IST

गुलाबी बोंडअळीने किती व काय नुकसान झाले, त्यांची कारणे काय, यासोबतच शेतकºयांच्या इतर व्यथा बुधवारी केंद्रीय समितीने कामठवाडा येथे जाणून घेतल्या. बोंडअळीला अटकाव करण्यासाठी फोरेमन स्ट्रॅप (कामगंध सापळे) कृषी केंद्रांत उपलब्ध करुन देणार, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : गुलाबी बोंडअळीने किती व काय नुकसान झाले, त्यांची कारणे काय, यासोबतच शेतकºयांच्या इतर व्यथा बुधवारी केंद्रीय समितीने कामठवाडा येथे जाणून घेतल्या. बोंडअळीला अटकाव करण्यासाठी फोरेमन स्ट्रॅप (कामगंध सापळे) कृषी केंद्रांत उपलब्ध करुन देणार, अशी माहिती यावेळी देण्यात आली. सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाईल, अशी माहिती समिती सदस्यांनी दिली.यावेळी माणिक कदम, दिलीप लोही, रोहन सावरकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी अडचणी मांडल्या. त्यावर समितीचा अहवाल लवकरच केंद्राकडे पाठविला जाईल, असे मुख्य सचिव विजयकुमार यांनी सांगितले.समितीत कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विजयकुमार, निती आयोगाचे (कृषी) डॉ.बी.गणेशराम, दिना नाथ, डीसीटीचे निर्देशक डॉ.आर.पी. सिंग, डेप्युटी डायरेक्टर ओमप्रकाश सुमन, डॉ.तरुण कुमार, डॉ.एस.आर. होलेटी, निदेशक डॉ.ए.एच. प्रकाश, उपायुक्त एस. सेल्वाराज यांचा समावेश होता. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, अमरावती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चवाळे, तहसीलदार रणजित भोसले, कृषी अधिकारी कैलास वानखडे, बीडीओ डॉ.मनोहर नाल्हे, तालुका कृषी अधिकारी संजय पाठक, किशोर अंबरकर, सोनाली चव्हाण, सरपंच चंद्रशेखर डंभे आदी उपस्थित होते.मूळ प्रश्नाला बगलगुलाबी बोंडअळी येण्याला केवळ शेतकरी कसे दोषी. शेतमालाचे भाव वारंवार का पाडले जातात. बोंडअळीची जाहीर केलेली रक्कम अद्याप का मिळाली नाही. शेतमाल विकण्यासाठी अडचणींचा सामना का करावा लागतो. बियाणे, किटकनाशके व रासायनिक खतांच्या किंमतीवर सरकारचे नियंत्रण का नाही. कपाशीवर बोंडअळी येणार नाही, याची कोण हमी देणार, या व इतर प्रश्नांना समिती सदस्यांनी बगल दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी