शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ग्रामसेवकांनी जपली सामाजिक बांधिलकी

By admin | Updated: November 7, 2015 02:41 IST

आदिवासीबहुल झरी तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेने आजाराने बाधीत असलेल्या बाल रूग्णाला मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.

मुकुटबन : आदिवासीबहुल झरी तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेने आजाराने बाधीत असलेल्या बाल रूग्णाला मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.झरी तालुक्यातील बोपापूर येथील दुसऱ्या वर्गात शिकणारा हर्षल मारोती पायघन जपानी मेंदूज्वराने आजारी आहे. त्याच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. हर्षल सध्या नागपूर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार घेत आहे. त्यासाठीही त्याला काहींनी मदत केली. याबाबत येथील ग्रामसेवकाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संघटनेसमोर हा विषय मांडला. संघटनेने लगेच बालरूग्णाला मदत करण्याचा निर्णय घेतला. संघटनेने सदस्यांकडून त्यासाठी निधी गोळा केला. तब्बल १० हजार ५०० रूपये गोळा झाले. ही मदत लगेच हर्षलच्या पालकांना सोपविण्यात आली. यातून ग्रामसेवक संघटनेने समाजापुढे आदर्श ठेवला. याशिवाय आणखी मदत करून इच्छिणाऱ्यांनी बालकाला मदत द्यावी, असे आवाहन संघटनेने केले. ग्रामसेवक संघटनेचे कापसे, ढोले, टाले, यनगंटीवार, किनाके, विजय उईके, ग्रामविकास अधिकारी, स्मिता काळे व ग्रामसेवकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. (शहर प्रतिनिधी)कुटुंबीयांकडून विद्यार्थ्याला मदतीचे आवाहनदुसरीतील सात वर्षीय विद्यार्थी हर्षद पायघन सध्या सावंगी मेघे यथे उपचारार्थ दाखल आहे. तो अत्यंत गरिब कुटुंबातील असल्यामुळे त्याच्या उपचाराकरिता कुटुंबियांनी मदतीचे आवाहन केले आहे. हर्षदला जपानी मेंदूज्वर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्यावर नऊ आठवडे उपचार चालणार आहेत. मोठ्या खर्चाच्या उपचारासाठी कुटुंबीयांची ऐपत नसल्यामुळे सध्या तो इलाजाविनाच आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेत जपानी मेंदूज्वर रोगाचा समावेश नसल्याने त्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे हर्षदच्या कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी हर्षदला उपचाराकरिता आर्थिक मदत करावी, असे आवाहन झरीचे गटविकास अधिकारी मेघावत यांनी केले आहे. झरी पंचायत समिती कार्यालयातर्फे हर्षदला ३९ हजार १४० रूपयांचा मदत निधी गुरूवारी देण्यात आला. हर्षदच्या वडिलांचे बँक खाते एसबीआय बँकेत असून खाते क्रमांक ३२७४५९०४०६९ आहे. मदतकर्त्यांनी या खात्यावर पैसे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.