शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

तुषार व ठिबक संचाच्या अनुदानाला सरकारची कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST

महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांची गळचेपी करत आहे. बाजार समिती संचालक निवडण्याचा अधिकार भाजपा सरकारने शेतकऱ्यांना दिला होता. तो अधिकार पुन्हा संपुष्टात आणला गेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादीच्या सल्ल्याने कारभार चालवितात. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र धार्जीन धोरण राबविले जात आहे. विदर्भातील सोयाबीन, कापूस, तूर उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडले आहे.

ठळक मुद्देअनिल बोंडे : सरकारने सिंचनाची कामे थांबवली, शेतकऱ्यांचा बाजार समितीतील मतदानाचा हक्क हिरावला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विद्यमान मुख्यमंत्री शेतकऱ्यांबाबत अनेक आश्वासने दिली होती. प्रत्यक्षात मात्र भाजप सरकारच्या काळातील ठिबक व तुषार संचाच्या अनुदानाला कात्री लावण्याचे काम सुरू आहे. जलयुक्त शिवारसारखी उपयोगी योजना बंद केल्याचा आरोप माजी कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी केला.यवतमाळ जिल्हा दौºयावर असताना भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांची गळचेपी करत आहे. बाजार समिती संचालक निवडण्याचा अधिकार भाजपा सरकारने शेतकऱ्यांना दिला होता. तो अधिकार पुन्हा संपुष्टात आणला गेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादीच्या सल्ल्याने कारभार चालवितात. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र धार्जीन धोरण राबविले जात आहे. विदर्भातील सोयाबीन, कापूस, तूर उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडले आहे.आता साखर कारखानदारी भोवतीच शासनाच्या योजना केंद्रीत होत आहेत, असा आरोप डॉ.अनिल बोंडे यांनी केला. बाजार समितीमधील काँग्रेस-राष्ट्रवादीची घराणेशाही मोडीत काढण्यासाठी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला होता. बाजार समितीमध्ये हमालालाही मतदान करण्याचा अधिकार आहे. मात्र शेतकरी त्यापासून वंचित होता. आता पुन्हा शेतकऱ्याचा मतदानाचा अधिकार या सरकारने गोठवला आहे. जलयुक्त शिवार योजनेला लोकसहभाग व नियोजन समितीतून पैसा दिला जात होता. तो बंद केला असून रोजगार हमी योजनेतून ही योजना राबविण्याचे निर्देश आहे. या योजनेला स्थगिती देण्याचे काम सुरू आहे. तुषार व ठिबक सिंचन अनुदान ४५ टक्क्यावरून फडणवीस सरकारने ८० ते ७५ टक्क्यापर्यंत केले होते. आदिवासी शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान दिले जात होते.या सरकारने या अनुदानालाही कात्री लावली आहे. नानाजी देशमुख योजनेसाठी संरक्षित शेतीसाठी यांत्रिकीकरणावर भर देवून ७५ टक्के अनुदान दिले जात होते. आता हे अनुदान महाविकास आघाडी सरकारने कमी केले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते ५० हजार नुकसान भरपाई देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती.आता ते मुख्यमंत्री असताना ही मदत मिळाली. तुरीचे हमीभाव खरेदी केंद्र अजूनही सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. यावेळी त्यांनी अन्य विषयांवरही आक्रमक मते मांडली.राज्याच्या कृषी धोरणावर राष्ट्रवादीचा पगडाराज्याच्या शेती धोरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचाच पगडा आहे. राष्ट्रवादीच्या बोळ्याने दूध पिवून कृषी धोरण राबविले जात असल्याचा घाणाघाती आरोप डॉ.अनिल बोंडे यांनी केला. शेतकऱ्यांच्या समस्यासाठी भाजप रस्त्यावर उतवून आंदोलन करेल, असाही इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :Anil Bondeअनिल बोंडेFarmerशेतकरी