शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

कळंब एमआयडीसीतून शासकीय धान्याची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 22:28 IST

कळंब शहरातील एमआयडीसी परिसरातून शासकीय धान्याची मोठ्या प्रमाणात काळ््याबाजारात विक्री सुरू होती. टोळी विरोधी पथकाने शनिवारी रात्री धाड टाकून २०५ क्विंटल तांदूळ जप्त केला. शासकीय शिक्का असलेल्या गोणीतून हा तांदूळ इतर पोत्यांमध्ये भरण्याचे काम सुरू होते.

ठळक मुद्दे२०५ क्ंिवटल तांदूळ जप्त : एलसीबीने केली तस्कराला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कळंब शहरातील एमआयडीसी परिसरातून शासकीय धान्याची मोठ्या प्रमाणात काळ््याबाजारात विक्री सुरू होती. टोळी विरोधी पथकाने शनिवारी रात्री धाड टाकून २०५ क्विंटल तांदूळ जप्त केला. शासकीय शिक्का असलेल्या गोणीतून हा तांदूळ इतर पोत्यांमध्ये भरण्याचे काम सुरू होते. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.पोलीस रेकॉर्डवर तडीपार असलेला कुख्यात शेख रहीम शेख करीम (४०) रा. माथा कळंब, हल्ली मुक्काम वर्धा याला अटक करण्यात आली. शेख रहीम हा शासकीय तांदूळ पोते बदलवून लगतच्या जिल्ह्यात विकत असल्याची माहिती टोळी विरोधी पथकाचे उपनिरीक्षक संतोष मनवर यांना मिळाली. त्यांनी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शासकीय पंचासमक्ष धाड टाकली. कळंब एमआयडीसीतील प्लॉट नंबर ए-५ येथे हा साठा सापडला. ४१० शासकीय कट्ट्यावर ‘गव्हर्मेंट आॅफ हरियाणा क्रॉप इयर २०१७-०१८’ असे लिहले आहे. त्याची किंमत ३ लाख ५० हजार रुपये आहे. हा साठा पोलिसांनी पुरवठा अधिकाऱ्यांच्या मदतीने सिल केला. ही कारवाई रविवारी पहाटे चार वाजतापर्यंत सुरू होती. आरोपी विरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम ३, ७ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. ही कामगिरी एसपी एम. राज कुमार, अपर अधीक्षक अमरसिंह जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात टोळी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर, सहायक फौजदार ऋषी ठाकूर, संजय दुबे, गणेश देवतळे, योगेश गटलेवार, अमोल चौधरी, किरण श्रीरामे, विनोद राठोड, आशिष गुल्हाणे, जयंत शेंडे, श्रीधर शिंदे, आकाश सहारे, राजकुमार कांबळे, यशवंत जाधव, शशिकांत चांदेकर, राहुल जुकूंटवार यांनी केली.धान्य तस्करावर पूर्वीच ५० गुन्हे नोंदशासकीय तांदळाची खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या शेख रहीम शेख करीम याच्यावर विविध प्रकारचे ५० गुन्हे नोंद आहेत. त्याला कळंबमधून तडीपार केले होते. त्याच्यासोबत तांदूळ तस्करीत मोठे रॅकेट सक्रीय आहे. या तस्करीची पाळेमुळे पुरवठा विभागापर्यंत पोहोचलेली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कळंब पोलीस आता पुढील तपास किती सखोल करतात, यातून धान्य तस्करीची व्याप्ती किती हे स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाMIDCएमआयडीसी