शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

सरकारने टाळली पेन्शन, मित्रांनी कमी केले टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:00 IST

एप्रिल महिन्यात यवतमाळ येथील सचिन ढोले व अमरावती येथील अनिल आढे या दोन आरोग्यसेवकांचा मृत्यू झाला. त्यांना जुनी पेन्शन योजना लागू नसल्यामुळे त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. अखेर ‘महाराष्ट्र आरोग्यसेवक’ या व्हॉट्सअप ग्रूपवर त्यांच्या परिवाराला मदत करण्याबाबत चर्चा झाली.

ठळक मुद्देआरोग्यसेवकांची माणुसकी : मृत सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी उभारला निधी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आरोग्यसेवक म्हणून रुग्णांसाठी झटणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यावर सरकारी पातळीवरून त्यांच्या निराधार कुटुंबाला कोणतीही मदत मिळू शकली नाही. पेन्शनचा लाभ सरकारने टाळला. अखेर इतर आरोग्यसेवक मित्रांनीच एकत्र येऊन या दोन्ही कुटुंबीयांना मदतनिधी गोळा करून आधार दिला.एप्रिल महिन्यात यवतमाळ येथील सचिन ढोले व अमरावती येथील अनिल आढे या दोन आरोग्यसेवकांचा मृत्यू झाला. त्यांना जुनी पेन्शन योजना लागू नसल्यामुळे त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. अखेर ‘महाराष्ट्र आरोग्यसेवक’ या व्हॉट्सअप ग्रूपवर त्यांच्या परिवाराला मदत करण्याबाबत चर्चा झाली. संजय सोनार कळवाडीकर, उमेश दिघाडे, प्रवीण चापके, नागनाथ दमकोंडवार, रुपेश वासनकर व इतर आरोग्यसेवकांनी चर्चा करून स्वच्छेने मदतनिधी जमा करण्यास सुरुवात केली. ७२ हजार २११ रुपयांचा मदतनिधी जमा झाला. त्याची समान विभागणी करून मृत आरोग्यसेकांच्या घरी जाऊन मदत देण्यात आली. हा मदतनिधी कायमस्वरुपी पुरणारा नाही. त्यामुळे शासनाने तत्काळ २००५ नंतरच्या सर्व कर्मचाऱ्याना जुनी पेन्शन योजना लागू करावी, असे मत जुनी पेन्शन हक्क संघटनेचे विभागीय अध्यक्ष मिलिंद सोळंके यांनी व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुरेंद्र दाभाडकर, शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेत्तर समन्वय समितीचे अमरावती विभागीय अध्यक्ष तथा राज्य समन्वयक मिलिंद सोळंके, यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा जुनी पेन्शन हक्क संघटनचे विश्वस्त नदीम पटेल, प्रवीण चापके, मनोज सरदार, मिलिंद पिंपळशेंडे, नीलेश सोनोने आदी उपस्थित होते.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन