शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वेळेत उपचार न मिळाल्याने यवतमाळात गोल्ड मेडलिस्ट डॉक्टरचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 13:44 IST

एमडी आयुर्वेदिक गोल्ड मेडलिस्ट डॉक्टरचा वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी पहाटे घडली. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्दे पाऊण तास भटकत राहिलेदोन रुग्णालयांचा नो-रिस्पॉन्सशासकीय रुग्णालयात मृत घोषित

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: येथील एमडी आयुर्वेदिक गोल्ड मेडलिस्ट डॉक्टरचा वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी पहाटे घडली. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.शेख मुश्ताक शेख खलील (४५) रा. पुष्पकुंज सोसायटी, वडगाव यवतमाळ असे या डॉक्टरचे नाव आहे. पुष्पकुंजमध्येच त्यांचे निवासस्थान व शिफा हॉस्पिटल आहे. गुरुवारी पहाटे ३ वाजता त्यांना हृदयाघात झाला. घाबरल्यासारखे वाटल्याने त्यांनी आपला मदतनीस राम शिरस्कर याला बोलविले व मुलाला सोबत घेऊन दुचाकी वाहनाने ते तिघे जण जवळच असलेल्या क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. परंतु तेथे प्रवेशद्वारावरच आम्ही सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण घेत नाही, असे सांगण्यात आले. आपण डॉक्टर आहोत असे शेख यांनी सांगितल्यानंतर एक परिचारिका आली, मात्र तिनेही तेच कारण सांगितले.

त्यामुळे डॉक्टर शेख तेथून येथीलच डॉ. महेश शाह यांच्या शाह हॉस्पिटल अ‍ॅन्ड क्रिटीकल केअर सेंटरमध्ये पोहोचले. तेथे दार उघडले गेले नाही, तेथे एक म्हातारा गृहस्थ उपस्थित होता. यावेळी डॉ. शेख यांनी डॉ. शाह यांना स्वत: मोबाईलवर कॉल केले. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. तेथेच डॉ. शेख कोसळले. त्यामुळे त्यांना तातडीने येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित केले गेले.

उपचारासाठी सुमारे अर्धा ते पाऊण तास भटकंती करूनही उपचार न मिळाल्याने एका डॉक्टरलाच जीव गमवावा लागला. या घटनेने शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. डॉक्टरांचीच ही अवस्था असेल तर सामान्य नागरिकांचे काय असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील बहुतांश डॉक्टरांनी कोरोनामुळे सर्दी, खोकला, तापीचे रुग्ण घेणे बंद केले. इतर आजाराचेही रुग्ण घेतले जात नाही. त्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयात जावे लागते. रुग्ण न घेण्यासाठी डॉक्टर प्रशासनाच्या एका पत्राचा सतत संदर्भ देतात.

मदतनीसाला रडू कोसळलेएमडी आयुर्वेद गोल्ड मेडलिस्ट असलेल्या डॉ. शेख यांना उपचारासाठी घेऊन रुग्णालयांमध्ये भटकंती करणारा त्यांचा मदतनीस राम शिरस्कर यांना झालेला प्रकार कथन करताना अक्षरश: रडू कोसळले होते.ही घटना दुदैवी आहे. असे व्हायला नको होते. रुग्णसेवेसाठी धडपडणाऱ्या एका चांगल्या डॉक्टरला आम्ही मुकलो आहोत.-संजीव जोशी, अध्यक्ष आयएमए, यवतमाळ.रुग्णालयांची सारवासारवदवाखान्यांचे दार ठोठावून उपचार न मिळाल्याने एका डॉक्टरचाच मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर संबंधित रुग्णालयांनी सारवासारव सुरू केली आहे. या अनुषंगाने हिराचंद मुणोत क्रिटीकेअर हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केले. डॉ. मुश्ताक शेख हे क्रिटीकेअर हॉस्पिटलच्या गेटवर आले. त्यानंतर गेटमनने सिस्टरला बोलविले. रुग्णाची अवस्था पाहून सिस्टर डॉक्टरला बोलविण्यासाठी आत गेल्या. मात्र त्यापूर्वीच डॉ. मुश्ताक यांना घेऊन कोणी तरी तेथून निघून गेले. त्यानंतर डॉ. केंद्रे तेथे आले असता पेशंट नसल्याने त्यांनी डॉ. शेख यांना कॉल केला. परंतु तो उचलला गेला नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. तर डॉ. महेश शाह म्हणाले, आमच्या हॉस्पिटलमध्ये नॉन कोविड पेशंट घेतले जात नाही. डॉ. शेख आले तेव्हा त्यांचा विद्यार्थीच आरएमओ म्हणून कार्यरत होता. परंतु त्यांच्यापर्यंत डॉ. शेख यांचा संदेश पोहोचला नाही.

टॅग्स :Deathमृत्यू