शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वडकीच्या शिक्षक कॉलनीत घरफोडी, रोखेसह सोन्याचे दागिने लंपास

By विलास गावंडे | Updated: March 28, 2023 18:58 IST

सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल चाेरी

वडकी (यवतमाळ)  : बंद घराचा कुलूप-कोंडा तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने, असा एक लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना वडकी (ता.राळेगाव) येथील शिक्षक कॉलनीत मंगळवारी सकाळी उघडकीस आली. वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खैरी येथे सोमवारी दुपारी महिलेची बॅग लंपास केल्याची घटना ताजी असतानाच रात्री घरफोडी झाल्याने नागरिकात भीती निर्माण झाली आहे.

शिक्षक कॉलनीतील किशोर कारिया यांच्या घरी किरायाने राहणारे महावितरण कंपनीचे वायरमन विशाल दारुंडे यांच्या घरी चोरी झाली. हे कुटुंब घरी नसताना घराचे दार उघडे दिसल्याने पाहणी केली असता चोरीचा प्रकार आढळून आला. तेव्हा नागरिकांनी विशाल दारुंडे याच्याशी भ्रमनध्वनीवर संपर्क केला. वडकी पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल पोलिसांनी तपासणी केली असता आलमारीचे कुलूप तोडुन त्यातील साहित्य फेकून असल्याचे दिसले.

विशाल दारुंडे नागपूर येथे गेले होते. त्यांनी वडील उदयचंद देवराव दारुंडे यांना वडकी पोलीस ठाण्याला पाठविले. सोन्याच्या तीन अंगठ्या, एक मंगळसूत्र, कानातले, चांदीचे चाळ आणि रोख पाच हजार रुपये, असा एक लाख १३ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरी गेल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली. तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार विजय महाले यांच्या मार्गदर्शनात रमेश मेश्राम, किरण दासरवार करत आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी