सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदन गृहाची स्वतंत्र नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. यासाठी गोवा येथील इमारतीच्या संकल्पनेचा आधार घेतला जाणार आहे. येथील कामाची गती वाढण्यासाठी अत्याधुनिका यंत्रणेचा उपयोग केला जाणार आहे.मेडिकल मध्ये असलेल्या शवविच्छदेन गृहात आज अनेक समस्या आहेत. अनेकदा येथील फिज्ररमध्ये बिघाड येतो, लोडशेडींगचा फटका येथील चिलिंग युनिटला बसतो. या अडचणी सोडविण्यासाठी नवीन शवविच्छदन गृह तयार केले जात आहे. या इमारतीमध्ये ट्रे व फ्रिजरमध्ये मृतदेह ठेवण्याऐवजी स्वतंत्र शितगृहच तयार केले जाणार आहे. यामध्ये एकाच वेळी ५० च्या वर मृतदेह ठेवण्याची सोय केली जाणार आहे. शिवाय शवविच्छेदन कक्षातही अत्याधुनिक टेबलसह साधनसामुग्री दिली जाईल.येथे डॉक्टर, स्वीपर आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी विश्राम कक्ष राहणार आहे. प्रकाश व्यवस्था दर्जेदार करणार आहे. इन कॅमेरा शवविच्छेदन केले जाणार आहे. महाविद्यालायचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रिगिरीवार यांनी गोवा येथील शवविच्छेदन गृहाची पाहणी केली होती. त्याच धरतीवर यवतमाळ मेडिकल मध्ये नवीन इमारत बांधली जात आहे.दर्जा सुधारणारअमरावती परिक्षेत्रात कायदेशीर बाबीच्या अनुषंगाने अनेकदा शवविच्छेदनासाठी यवतमाळ न्याय वैद्यकशास्त्र विभागाकडे आणले जाते. त्यामुळे अस्तित्वात असलेले शवविच्छेदनगृह लहान पडत होते.
यवतमाळ ‘मेडिकल’मध्ये शवविच्छेदनगृहाचा गोवा पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 21:36 IST
स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदन गृहाची स्वतंत्र नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. यासाठी गोवा येथील इमारतीच्या संकल्पनेचा आधार घेतला जाणार आहे. येथील कामाची गती वाढण्यासाठी अत्याधुनिका यंत्रणेचा उपयोग केला जाणार आहे.
यवतमाळ ‘मेडिकल’मध्ये शवविच्छेदनगृहाचा गोवा पॅटर्न
ठळक मुद्देबांधकामाला सुरुवात : मृतदेहांसाठी अद्ययावत फ्रिजर रूम