शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोट प्रकरणः प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
2
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
3
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
5
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
6
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
7
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
8
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
9
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
10
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
11
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
12
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
13
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
14
मेघा धाडेनं सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, म्हणाली - "त्या दिवशी मला..."
15
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
16
Hit and run: २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?
17
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
18
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
19
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
20
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!

सरकारी डॉक्टरांच्या सेवेने चार मुलींसह आईलाही जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 21:27 IST

यवतमाळच्या सरकारी दवाखान्याने चक्क चार गर्भ असलेल्या महिलेची किचकट वाटणारी प्रसुतीही नैसर्गिकरित्या घडवून आणली.

ठळक मुद्देचार गर्भ असूनही नैसर्गिक प्रसुतीगरीब आईसाठी दीड महिना झटले डॉक्टर

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चकाचक खासगी दवाखान्यांमध्ये सर्व सोयी असल्या तरीही बहुतांश गर्भवतींना ‘सिझर’ करण्याचाच मार्ग दाखविला जातो. पण यवतमाळच्या सरकारी दवाखान्याने चक्क चार गर्भ असलेल्या महिलेची किचकट वाटणारी प्रसुतीही नैसर्गिकरित्या घडवून आणली. सरकारी दवाखान्यांविषयीचा न्यूनगंड पुसून टाकणारी ही यशकथा कशी घडली? मजूर महिलेची दीड महिना सेवा करणाऱ्या सरकारी डॉक्टरांनी हे शक्य केले. त्यांनी नेमकी कशी सेवा केली, कसे उपचार केले... वाचा त्यांच्याच शब्दात.‘एकाच वेळी चार मुलींना दिला जन्म’ या वृत्ताने गेल्या आठवड्यात अख्ख्या जिल्ह्याला आनंदित आणि चकितही केले होते. पहिली मुलगी असताना पुन्हा चार मुलींचे हसून स्वागत करणाऱ्या या आईचे नाव आहे, राणी प्रमोद राठोड. दारव्हा तालुक्यातील चिखली रामनाथ येथील राठोड दाम्पत्य रोमजुरी करणारे. राणी गर्भवती असताना तिला त्रास जाणवू लागला. ती यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात (मेडिकल) आली, तेव्हाच डॉक्टरांनी ओळखले, राणीच्या पोटात चार गर्भ आहेत. पण तिला एकाएकी सांगण्यापेक्षा डॉक्टरांनी आधी तिच्यावर योग्य उपचार करण्याचा निर्णय घेतला. गर्भ सहा महिन्यांचे झाल्यावर राणीला चार गर्भ असल्याची कल्पना दिली.

डॉक्टरांनी नेमके काय केले?आता ही प्रसुती यशस्वी करणे, हे डॉक्टरांसाठीही आव्हानच होते. प्रसुती विभाग प्रमुख डॉ. रोहिदास चव्हाण, डॉ. निमिषा शर्मा, डॉ. सुषमा गोरे, डॉ. पूनम कुलसंगे, डॉ. भव्या दोशी, डॉ. प्रक्षक शहा यांच्या चमूने ही जबाबदारी स्वीकारली. राणीला दवाखान्यात भरतीच करून घेण्यात आले. रात्रंदिवस या चमूने राणीची सुश्रृषा केली. उपचारासोबतच तिच्या आहाराची डॉक्टरांनी काळजी घेतली. तिला भरपूर प्रोटीन मिळावे, यासाठी अंडी, फळे यासोबतच डॉक्टरांनी तिळाचे लाडू करून खाऊ घातले. दिवसातून दोन वेळा राणीला दूध दिले. प्रत्येक आठवड्यात तिचे वजन मोजण्यात आले. रक्तदाब वेळोवेळी तपासण्यात आला. दोन-दोन हप्त्यांनी रक्ततपासणी करण्यात आली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सोनोग्राफी करून घेण्यात आली. गर्भवती रुग्णासाठी जे-जे करावे लागते ते सर्व डॉक्टरांनी केलेच; पण त्यासोबतच चार गर्भाची यशस्वी प्रसुती हे आव्हान पेलण्यासाठी डॉक्टर ‘सेवक’ही बनले. दर १५ मिनिटांनी आवश्यक औषध दिले.

गर्भपिशवीच्या आकुंचनावर लक्ष, गर्भ फिरण्याचा धोका टाळलाराणीला प्रत्यक्ष प्रसवकळा सुरू झाल्यावर डॉक्टरांपुढे खरे आव्हान होते. काहीही झाले तरी आईच्या जीवाला धोका होऊ नये, हे त्यांचे पहिले ‘लक्ष्य’ होते. अतिरक्तस्त्रावाने आईला धोका होऊ नये म्हणून आधीच दोन बॉटल रक्ताची व्यवस्था करण्यात आली. पण नंतर त्याची गरजच पडली नाही. चारपैकी पहिले बाळ बाहेर आल्यावर गर्भ पिशवीचे आकुंचन न झाल्यास दुसरे बाळ किंवा त्यानंतरच्या सर्वच बाळांची प्रसुती अशक्य झाली असती. मग सिझर करण्याशिवाय पर्यायच नसता. पण असे होऊ नये म्हणून डॉक्टरांनी सलाईनद्वारे राणीला पिटोसीन हे औषध दिले. चारही बाळ पायाळू जन्माला आले. अशा घटनेत, पहिले बाळ जन्मास आल्यानंतर गर्भातील दुसरे बाळ फिरण्याचा धोका असतो. ते गर्भात फिरल्यास प्रसुती न होण्यासोबतच आईच्या जीवालाही धोका होऊ शकतो. तो टाळण्यासाठी मग महिला डॉक्टरांनी आईचे पोट धरून ठेवले. आतील बाळांना फिरण्यापासून थांबवले आणि चारही मुलींचा जन्म पायाळूच झाला.डॉक्टर म्हणतात, आमचाही आत्मविश्वास वाढलायापूर्वी यवतमाळच्या ‘मेडिकल’मध्ये दोन गर्भ असलेल्या महिलांची प्रसुती करण्याचे प्रसंग अनेकदा आले. पण चार गर्भ असलेल्या महिलेची प्रसुती करण्याचा आमचाही हा पहिलाच प्रसंग होता. आम्ही सुरुवातीपासूनच ‘नैसर्गिक प्रसुती’ करण्याचा निर्णय घेतला होता. तो यशस्वीही झाला. आमच्या करिअरमध्ये ही घटना मार्गदर्शक ठरणार आहे. आता आमच्यामध्येही कितीही ‘क्रिटिकल’ पेशंट आला तरी उपचार करण्याचा आत्मविश्वास आला आहे, अशा शब्दात डॉ. रोहिदास चव्हाण, डॉ. निमिषा शर्मा, डॉ. सुषमा गोरे, डॉ. पूनम कुलसंगे, डॉ. भव्या दोशी, डॉ. प्रक्षल शहा यांनी आपली कृतार्थ भावना व्यक्त केली. अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांचा पुढाकार व वेळोवेळी केलेले मार्गदर्शनसुद्धा तेवढेच महत्वपूर्ण ठरल्याचे या डॉक्टरांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्य