संधी द्या, शिक्षकांची रखडलेली भरती करून दाखवेनच - प्रकाश काळबांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 08:13 PM2020-11-19T20:13:23+5:302020-11-19T20:15:38+5:30

यवतमाळ जिल्ह्यात प्रचार : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ शिक्षकांसाठीच

Give it a chance, we will show it by recruiting teachers - Prakash Kalbande | संधी द्या, शिक्षकांची रखडलेली भरती करून दाखवेनच - प्रकाश काळबांडे

संधी द्या, शिक्षकांची रखडलेली भरती करून दाखवेनच - प्रकाश काळबांडे

Next
ठळक मुद्देआम्ही हाडाचे शिक्षक आहोत. शिक्षकांसाठीच तयार झालेल्या संघटनेचे पाईक आहोत. यावेळी मला संधी द्या, मी तुमच्या समस्यांचे निराकरण करेन

यवतमाळ : शालेय शिक्षकांची रखडलेली भरती पुन्हा करणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होणारा विपरीत परिणाम आणि शिक्षकांवर येणारा ताण कमी होईल. मला सभागृहात पाठवा, मी शिक्षकांची रखडलेली भरती करून दाखवेन, असे आश्वासन प्रकाश काळबांडे यांनी दिग्रस तालुक्याच्या प्रचारादरम्यान दिले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार प्रकाश बाबाराव काळबांडे यांना दाैऱ्यादरम्यान शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा लाभला.

शिक्षकांच्या अनेक समस्यांचा आणि त्यावरील उपायांचा ऊहापोह यावेळी झाला. आशेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी मते मिळविल्यावर सत्तेशी हातमिळवणी करून मतदार शिक्षकांची दिशाभूल केली, असा सूर मतदारांमधून व्यक्त झाला. आम्ही हाडाचे शिक्षक आहोत. शिक्षकांसाठीच तयार झालेल्या संघटनेचे पाईक आहोत. शिक्षकांच्या समस्या सोडविणे हेच आमचे ध्येय. यावेळी मला संधी द्या, मी तुमच्या समस्यांचे निराकरण करेन, अशी ग्वाही त्यावर काळबांडे यांनी दिली.

या दौऱ्यात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार प्रकाश बाबाराव काळबांडे आणि प्रांतीय अध्यक्ष श्रावण बरडे, विभागीय कार्यवाह एम.डी. धनरे, जिल्हाध्यक्ष अशफाक खान, कार्याध्यक्ष विजय खरोडे, सहकार्यवाह आनंद मेश्राम, उपाध्यक्ष श्रावणसिंह वळते, सल्लागार तापेश्वर पिसे, तालुका कार्यवाह गोपाल बुरले, जिल्हा कार्यवाह महेश अंदुरे, दत्ता भिसे, एन.यू. राठोड, ए.एन. राऊत, महिपाल, मांगलेकर, जी.एन. राठोड, तायडे, प्रमोद टेकाळे, बोबडे, एस.आर. राठोड, एस.एस. राऊत, संतोष पारधी, पवन बोरकर, मनोहर काटकर, मुख्याध्यापक प्रदीप वानखडे, सचिन पाटील, प्रदीप वानखडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Give it a chance, we will show it by recruiting teachers - Prakash Kalbande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.