लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : येथील एका वात्सल्यसिंधू मातेने स्वत:ची किडनी दान केल्याने मुलीला जीवदान मिळाले. आईच्या दातृत्वामुळे मुलीचा पुन:र्जन्म झाला. मातृप्रेमापुढे मृत्यूलाही हार मानावी लागली. ही हृदयस्पर्शी कहाणी सर्वांनाच प्रेरणादायी ठरली.येथील अश्विनी सुनील अस्वार (३६) गेल्या सहा महिन्यांपासून किडणीच्या आजाराने त्रस्त होत्या. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अस्वार कुटुंब तणावाखाली आले. पदरमोड करीत त्यांनी सर्वस्व पणाला लावले. अमरावतीच्या डॉ.अविनाश चौधरी यांच्याकडे अश्विनीचे उपचार आणि डायलिसिस सुरू होते. मुलीच्या वेदना आणि दु:ख आई अगदी जवळून अनुभवत होती. दरम्यान, अश्विनीची आई वनिता दत्तात्रय कसंबे यांनी मुलीला किडनी देण्याचा संकल्प केला. मुलीचे प्राण वाचविण्यासाठी माऊली पुढे सरसावली.आईचा त्याग, समर्पण बघून डॉक्टरांची चमूसुद्धा भारावली. लगेच अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. यामुळे अश्विनी यांना जीवनदान मिळाले. खरोखरंच, मातृप्रेम जिंकले, मृत्यूचा पराभव झाला, असेच म्हणावे लागेल.अस्वार कुटुंब आर्थिक विवंचनेतअश्विनी यांच्याकरिता आईने आपले प्राण पणाला लावले. कुटुंबाने पदरमोड करीत आयुष्याची कमाई खर्ची घालून अश्विनीच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण केली. वैद्यकीय उपचारासाठी तब्बल पाच लाखांच्यावर खर्च झाल्याने अस्वार कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडले आहे. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी तथा सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.पोर्टलमुळे शासकीय मदतीस अडचणदुर्धर आजारावरील उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत दिली जाते. मात्र हे पोर्टल बंद असल्यामुळे या कुटुंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळाली नाही. त्यामुळे शासनस्तरावर पाठपुरावा होणे आवश्यक आहे.
स्वत:ची किडनी देऊन वाचविले मुलीचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 06:00 IST
अमरावतीच्या डॉ.अविनाश चौधरी यांच्याकडे अश्विनीचे उपचार आणि डायलिसिस सुरू होते. मुलीच्या वेदना आणि दु:ख आई अगदी जवळून अनुभवत होती. दरम्यान, अश्विनीची आई वनिता दत्तात्रय कसंबे यांनी मुलीला किडनी देण्याचा संकल्प केला. मुलीचे प्राण वाचविण्यासाठी माऊली पुढे सरसावली.
स्वत:ची किडनी देऊन वाचविले मुलीचे प्राण
ठळक मुद्देआईचा त्याग : दारव्हाची हृदयस्पर्शी कहाणी, शासकीय मदत रखडली