शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून त्यांनी सरपंच, उपसरपंचाच्या खुर्चीला घातला चपलांचा हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 13:57 IST

फुलसावंगी ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार सरपंच व उपसरपंच अनुपस्थित राहत असल्याचा आरोप करीत, शनिवारी संतप्त युवकांनी त्यांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून निषेध नोंदविला.

ठळक मुद्देसरपंच, उपसरपंच कार्यालयात वारंवार अनुपस्थित राहत असल्याचा आरोप

यवतमाळ : अनेक दिवसांपासून फुलसावंगी येथील ग्रामपंचायतीचा कारभार रामभरोसे आहे. याबाबत काही युवकांनी सरपंच व उपसरपंच यांनी कार्यालयीन वेळेत कार्यालयात हजर राहावे, असे निवेदन दिले होते. मात्र, निवेदन देऊनही सरपंच, उपसरपंच यांच्या कार्यपद्धतीत बदल न झाल्याने संतप्त युवकांनी शनिवारी त्यांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून निषेध नोंदविला.

फुलसावंगी ही महागाव तालुक्यातील सर्वात मोठी १७ सदस्यीय ग्रामपंचायत आहे. शीतल भिसे सरपंच, तर नवाब जानी कमरबेग उपसरपंच आहे. ग्रामस्थांना कोणतेही काम असले, तर सरपंच यांच्या घरी जाऊन स्वाक्षरी आणावी लागो. त्यांच्या घराच्या पायऱ्या झिजव्याव्या लागत. सरपंच मासिक सभा वगळता उपस्थित राहत नाहीत. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य ग्रामस्थांना होतो, असा आरोप युवकांनी केला.

सोहेल नवाब यांनी सरपंचांना दिवसातून काही तास ठरावीक वेळेत कायार्लयात हजर राहण्यासाठी निवेदन दिले होते. मात्र, त्यांनी निवेदनाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे संतप्त झालेल्या युवकांनी शनिवारी सकाळी सरपंच, उपसरपंच यांच्या खुर्चीला चपलांचे हार घालून निषेध नोंदविला यावेळी शे. अनिस, सोहेल नवाब उपस्थित होते. या संदर्भात सरपंचांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या शुक्रवारपासून बाहेरगावी गेल्याची माहिती मिळाली.

हा प्रकार असंवैधानिक

फुलसावंगी ग्रामपंचायतीत झालेला प्रकार असंवैधानिक असून समस्या सोडविण्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध होते, असे ग्रामसेवक बालाजी जोगदंड यांनी सांगितले. या निषेधच्या चौकशी अंती योग्य ती कायदेशीर कारवाई करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अद्याप या घटनेची माहिती माझ्यापर्यंत आली नाही. माहिती मिळाल्यानंतर सविस्तर सांगता येईल.

जी.एस. ठाकूर, गटविकास अधिकारी, महागाव

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच