शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

स्पिरीटपासून दारू बनविणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 05:00 IST

भैय्या यादव याने  हा कारखाना थाटला होता. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या माध्यमातून ही बनावट दारू शहरातील विविध अवैध दारू गुत्त्यांवरून त्याची विक्री केली जात होती. स्पिरीट व इतर घातक रसायनांचा वापर करून ही दारू तयार करण्यात येत हेाती. २०० लीटर स्पिरीटपासून सहा ते सात लाख रुपयांची दारू तयार करून विक्री होत होती. हे स्पिरीट दिग्रसवरून खरेदी करीत असल्याचे आरोपीने सांगितले. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अवैध दारू विक्री करणारे अनेक गुत्ते शहरात आहे. अशा गुत्त्यांवर स्पिरीटपासून बनविलेली देशी दारू विकली जात होती. ही बनावट दारू पुरविणाऱ्या टोळीचा पोलिसांना सुगावा लागला. थेट दारूच्या कारखान्यावर बुधवारी दुपारी अवधूतवाडी पोलिसांनी धाड टाकून चौघांना रंगेहात अटक केली. गोधनी परिसरातील निर्जनस्थळी हा कारखाना सुरू होता. पोलीस दप्तरी कुख्यात म्हणून नोंद असलेला दीपक उर्फ भैय्या राममनोहर  यादव (३८) रा. देवीनगर लोहारा,योगेश पांडुरंगजी रेकलवार (३६) रा. गोधनी कोठा,अंकुश चिंतामण तिरमारे (२०) रा. देवीनगर लोहारा यांच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली. भैय्या यादव याने  हा कारखाना थाटला होता. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या माध्यमातून ही बनावट दारू शहरातील विविध अवैध दारू गुत्त्यांवरून त्याची विक्री केली जात होती. स्पिरीट व इतर घातक रसायनांचा वापर करून ही दारू तयार करण्यात येत हेाती. २०० लीटर स्पिरीटपासून सहा ते सात लाख रुपयांची दारू तयार करून विक्री होत होती. हे स्पिरीट दिग्रसवरून खरेदी करीत असल्याचे आरोपीने सांगितले. बनावट  दारू कारखान्याची माहिती खबऱ्याद्वारे पोलीस उपनिरीक्षक दर्शन दिकोंडवार यांना मिळाली. पथकासह त्यांनी थेट गोधनी  परिसरातील विरळ वस्ती असलेल्या भागातील हा कारखाना गाठला. शिताफीने चारही बाजूंनी घेरा टाकून कारखान्यात प्रवेश केला. तेथे दीपक यादव हा इतर तीन साथीदारांसह दारू बनविताना रंगेहात सापडला. घटनास्थळावरून देशी दारूच्या रिकाम्या बॉटल, काही भरलेल्या बॉटल, २०० लीटर स्पिरीट, दारू सारखा रंग व वास येण्यासाठी वापरले जाणारे इसेन्स, सील करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, चारचाकी वाहन, दोन दुचाकी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. एसडीपीओ संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई ठाणेदार मनोज केदारे, पोलीस उपनिरीक्षक दर्शन दिकोंडवार, जमादार नासीर शेख, बगमारे, सुधीर पिदूरकर आदींनी केली.  

  टिन पत्र्याच्या शेडचा वापर - बनावट दारू तयार करण्यासाठी टिनाच्या शेडचा वापर केला. घर बांधकामासाठी साहित्य ठेवण्याकरिता तयार केलेले हे शेड बनावट दारू कारखान्यात रुपांतरित केले. मागील काही महिन्यांपासून हा कारखाना सुरू असल्याची माहिती आरोपींनी दिली. दारूसाठी लागणारे स्पिरीट व इतर घातक रसायन कोठून आणले याचा शोध पोलीस घेत आहे. 

भंगारातून मिळविल्या रिकाम्या बॉटलn मान्यता प्राप्त दारू कारखान्यात बॉटलिंग झाली असावी असे पॅकिंग आरोपींकडून केले जात होते. भंगारातून दारूच्या रिकाम्या बॉटल खरेदी करून त्यात बनावट दारू भरली जात होती. नंतर त्याला सील करून लेबलिंग केले जात होते. वितरणासाठी मुले ठेवून यंत्रणा उभी केली होती.  याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. 

बनावट दारूमुळे थेट मृत्यूला निमंत्रण स्पिरीटपासून बनविलेली दारू अधिक घातक असून यामुळे लिव्हर कॅन्सर, लिव्हर सिरोसीस या सारखे दुर्धर आजार होतात. लिव्हर निकामी झाल्यानंतर पोटात पाणी जमा होते. रक्ताच्या उलट्या होतात. शरीरातील रक्त कमी होते, हातापायावर सुज येते, प्रचंड वेदना होऊन रुग्णांचा मृत्यू होतो. - डॉ. बाबा येलकेविभाग प्रमुख औषधी वैद्यक शास्त्र, यवतमाळ

 

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस