लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : येथे गांजाची खेप घेऊन येत असलेल्या इंडिका कारला पोलीस पथकाने पोहंडूळ फाट्याजवळ पकडले. एम.एच.व्ही-३८५६ या कारची पोलिसांनी झडती घेतली असता त्यामध्ये गांजाची पोती आढळून आली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान केल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. प्रत्यक्ष मात्र ही कारवाई दोन दिवसापूर्वीच झाली असल्याची चर्चा आहे.पोहंडूळ फाट्यावरच पोलीस कारवाई सुरू असल्याने बघ्यांची गर्दी जमली होती. या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मागितली असता त्यांंनी माहिती देण्याचे टाळले. गांजा घेऊन जाणारे वाहन यवतमाळातील एका पथकाने दोन दिवसापूर्वीच पकडले. या वाहनातून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त झाला आहे. यात दोन आरोपींनाही ताब्यात घेतले आहे. मात्र रेकॉर्डवरची माहिती सांगण्यास कुणीच तयार नाही. सर्वांसमक्ष केलेली कारवाई अचानक पोलीस दडपण्याचा प्रयत्न का करीत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गांजाचे मोठे रॅकेट हाती लागल्यानंतरही पोलिसांकडून स्थानिक पत्रकारांना माहिती देताना जाणीवपूर्वक टाळले जात आहे. त्यामुळे या कारवाईवरच शंकाकुशंका व्यक्त होत आहे. लगतच्या तेलंगाणातून माहूरमार्गे हा गांजा महागाव, उमरखेड येथे जात असावा असा अंदाजही वर्तविण्यात येत आहे.
महागावजवळ गांजाची पोती जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 22:01 IST
येथे गांजाची खेप घेऊन येत असलेल्या इंडिका कारला पोलीस पथकाने पोहंडूळ फाट्याजवळ पकडले. एम.एच.व्ही-३८५६ या कारची पोलिसांनी झडती घेतली असता त्यामध्ये गांजाची पोती आढळून आली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान केल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. प्रत्यक्ष मात्र ही कारवाई दोन दिवसापूर्वीच झाली असल्याची चर्चा आहे.
महागावजवळ गांजाची पोती जप्त
ठळक मुद्देपोलिसांची माहितीस टाळाटाळ : पोहंडूळ फाट्यावर कारवाई