शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

फसव्या कर्जमाफीविरुद्ध १०० शेतकऱ्यांची शवयात्रा

By admin | Updated: July 5, 2017 00:13 IST

राज्य शासनाने दिलेली कर्जमाफी अत्यंत फसवी आहे. यात सर्व गरजू शेतकऱ्यांचा समावेश होणे शक्य नाही.

सर्वपक्षीय सहभाग : शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीची बैठकलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने दिलेली कर्जमाफी अत्यंत फसवी आहे. यात सर्व गरजू शेतकऱ्यांचा समावेश होणे शक्य नाही. आकड्यांचा खेळ करून शासनाने शेतकऱ्यांना सरसकट मारले आहे. त्यामुळे सरकारचा निषेध म्हणून १४ जुलै रोजी शंभर शेतकऱ्यांची शवयात्रा काढून अभिनव आंदोलन करण्याची घोषणा शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने पत्रपरिषदेत केली.मंगळवारी समितीची जिल्हा बैठक येथील नगरवाचनालयाच्या सभागृहात पार पडली. यात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह विविध संघटनांच्या नेत्यांनी हजेरी लावली. शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार म्हणाले, सरकारने गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीतून बाद केले आहे. त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील शेतकरी शवयात्रा काढणार आहेत. १०० तिरड्यांवर शेतकऱ्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. आमदार बच्चू कडू, माजी आमदार वामनराव चटप, चंद्रकांत वानखडे आदी नेते या शवयात्रेत सहभागी होणार आहेत. पत्रकार परिषदेला माजी आमदार विजयाताई धोटे, अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर, जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत, यवतमाळ बाजार समिती सभापती रवींद्र ढोक, आर्णी बाजार समिती सभापती राजू पाटील, अशोक भुतडा, गोपाल चव्हाण, प्रमोद कुदळे, संतोष अरसोड, पुष्पा नागतुरे, विजयराज शेगेकर, रामचंद्र मडकाम, गुलाब उमरतकर, राजेंद्र हेंडवे, चंद्रकांत अलोणे, रूस्तम शेख, आदींची उपस्थिती होती.सत्ताधाऱ्यांना अंत्यदर्शनाची खास सोयशेतकऱ्यांची शवयात्रा आंदोलनात शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीसोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, बसपा, आरपीआय, बामसेफ, संभाजी ब्रिगेड आदींसह विविध संघटना सहभागी होणार आहे. मात्र सत्ताधारी भाजपा आंदोलनापासून दूर आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे अंत्यदर्शन घेता यावे याकरिता दत्त चौकात शवयात्रा काही काळ थांबविण्यात येईल. सत्ताधाऱ्यांनी दत्त चौकात येऊन अंत्यदर्शन घ्यावे, असे पत्रकार परिषदेत देवानंद पवार यांनी सांगितले.