शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
4
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
5
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
6
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
7
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
8
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
9
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
10
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
11
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
12
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
13
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
14
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
15
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
16
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
17
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
18
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
19
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
20
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

‘मजीप्रा’वर पाण्यासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 22:09 IST

गत महिनाभरापासून नळ न आल्याने तुकडोजीनगरातील संतप्त महिलांनी जीवन प्राधिकरणावर धडक दिली. मोर्चा धडकताच कार्यकारी अभियंत्यांनी काढता पाय घेतला. यामुळे प्राधिकरणाच्या वाहनाची हवा सोडून महिलांनी निषेध नोंदविला.

ठळक मुद्देवाहनाची हवा सोडली : तुकडोजीनगरात पाणी नाही, पालिकेवरही धडक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत महिनाभरापासून नळ न आल्याने तुकडोजीनगरातील संतप्त महिलांनी जीवन प्राधिकरणावर धडक दिली. मोर्चा धडकताच कार्यकारी अभियंत्यांनी काढता पाय घेतला. यामुळे प्राधिकरणाच्या वाहनाची हवा सोडून महिलांनी निषेध नोंदविला. तर दुसरीकडे बांगरनगरातील महिलांनी नगरपरिषदेवर धडक देत पाणीपुरवठा विभागाच्या कक्षात ठिय्या दिला.शहरातील पाणी प्रश्नाने बिकट रूप धारण केले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. यामुळे संतप्त महिलांनी मंगळवारी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक दिली. पाण्याची व्यथा मांडण्यासाठी आलेल्या या महिलांना कार्यकारी अभियंताच भेटले नाही. यामुळे मोर्चेकरी महिलांची तीव्र नाराजी झाली. त्यांनी प्राधिकरणाच्या कामकाजावर संताप नोंदविला.तुकडोजीनगरामध्ये गत महिनाभरापासून नळ नाही. या भागात १० ते १२ दिवसानंतरच टँकर फिरकतो. यात अर्धा ड्रम पाणी मिळते. या पाण्यात कसे होणार, असा प्रश्न या भागातील महिलांनी उपस्थित करीत प्राधिकरणाचे पाणी देण्याची मागणी केली. जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना केल्यानंतरही नळ सोडले जात नााही. काही भागात चार ते पाच दिवसापासून नळ सुरू आहे. मात्र तुकडोजीनगराला पाणी मिळत नाही, अशी खंत या महिलांनी अभियंत्यापुढे व्यक्त केली. जीवन प्राधिकरणाचे नियोजन चुकले. प्रशासनाने कामकाजात दिरंगाई केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. पाणी न मिळाल्यास बुधवारपासून उपोषण करण्याचा इशारा महिलांनी दिला. यावेळी महिलांनी आंदोलनाचा एक भाग म्हणून जीवन प्राधिकरणाच्या वाहनाची हवा सोडली. यावेळी छाया सपाट, अर्चना गिरोळकर, संगीता चातूरकर, संध्या भोयर, कांता अंबागरे, लिला राऊत, सुधा भोयर, मंदा तपके, आशा सोनकुसरे, छबू पखाले उपस्थित होत्या. शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून उपाययोजना तोकड्या पडत असल्याने नागरिकांत संताप निर्माण झाला आहे. या संतापाला वाट मोकळी करण्यासाठी दररोज मोर्चे धडकत आहेत.विशिष्ट घरांनाच पाणीपुरवठाप्रत्येक वॉर्डात पाणीवाटपासाठी टँकर देण्यात आले आहे. मात्र नगरसेवक विशिष्ट घरांनाच पाण्याचे वाटप करतात, असा आरोप तुकडोजीनगरातील महिलांनी केला आहे. बांगरनगरामध्येही २५ दिवसांपासून नळ नाही. १० ते १५ दिवसानंतर या ठिकाणी टँकर फिरकतो. यामुळे महिलांचे पाण्यासाठी हाल होत आहे, असा आरोप बांगरनगरातील महिलांनी केला आहे. यावेळी सुनिता बोरकर, वंदना आगमे, रूपाली उपरकार, सोनाली मेश्राम, प्रज्ञा बिडवे, महानंदा इंगळे, मिरा खांदवे, शांता वांडरे, दीपमाला राठोड उपस्थित होत्या.