शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
5
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
6
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
7
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
8
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
9
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
10
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
11
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
12
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
13
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
14
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
15
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
16
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
17
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
18
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
19
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड तहसीलदारासमोर इसमाचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: August 3, 2014 00:19 IST

आवश्यक कागदपत्रांसाठी तहसीलदमध्ये वारंवार माराव्या लागणाऱ्या येरझाऱ्यांना कंटाळून एका इसमाने चक्क तहसीलदारांसमोरच अंगावर ब्लेडने असंख्य जखमा करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

उमरखेड (कुपटी) : आवश्यक कागदपत्रांसाठी तहसीलदमध्ये वारंवार माराव्या लागणाऱ्या येरझाऱ्यांना कंटाळून एका इसमाने चक्क तहसीलदारांसमोरच अंगावर ब्लेडने असंख्य जखमा करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे तहसील प्रशासनासह शहरातही खळबळ उडाली आहे. शहरातील गोचर स्वामी वार्डातील रहिवासी भालचंद्र ढोबळे हा सध्या बहिणीच्या नवऱ्याच्या खूनप्रकरणी अमरावती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याला पॅरोलवर सुटी मिळण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे तहसीलमधून काढण्यासाठी त्याचा भाऊ मनोज ढोबळे (५०) गेल्या काही दिवसांपासून तहसील कार्यालयात येरझारा मारत होता. अमरावती कारागृह अधीक्षकांचे पत्र उमरखेड तहसीलदारांना प्राप्त झाले होते. त्यानुसार तहसीलने मनोज ढोबळेकडे आवश्यक ते कागदपत्र देणे अपेक्षित होते. परंतु तहसीलदार सचिन शेजाळ हे हेतूपरस्पर आपल्याला त्रास देत असून कागदपत्र देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मनोज ढोबळे याने केला आहे. तहसीलच्या याच कारभाराला कंटाळून शनिवारी दुपारी ४ वाजता तहसीलच्या आवारात तहसीलदारांसमोर मनोजने स्वत:च्या अंगावर ब्लेडने असंंख्य वार करून घेतले. या वेळी तहसील परिसरात असंख्य नागरिकांची उपस्थिती होती. त्यामुळे तिथे एकच गोंधळ उडाला. ब्लेडने स्वत:वर वार केल्यानंतर मनोज ढोबळे रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तत्काळ उमरखेड शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तहसीलच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून ही घटना घडल्याची चर्चा शहरात आहे. या घटनेमुळे महसूल प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे. सध्या मनोज ढोबळे याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले. (वार्ताहर)