शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात दुय्यम दर्जाच्या औषध विक्रीला मोकळे रान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 13:01 IST

औषध निरीक्षकच नाही : गोपनीय कारवाई व धाडसत्र नसल्याने बिनधास्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मानवी आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन विभाग सर्वात महत्त्वाचा आहे. येथूनच अनेक समस्यांचे नियंत्रण करता येते. गुणवत्तापूर्ण औषध असेल तर आजारपणाला सहज दूर सारता येते. याकडेच मोठे दुर्लक्ष होत आहे. अमरावती विभागात येणाऱ्या पाच जिल्ह्यांमध्ये औषध निरीक्षकाची बहुतांश पदे रिक्त आहेत. तसेच, सहायक आयुक्त व सहआयुक्त यांच्याही जागा रिक्त असल्याने दुय्यम दर्जाच्या औषधी विक्रीसाठी मोकळे रान उपलब्ध आहे.

विभागीय स्तरावर सहआयुक्त औषध हे पद रिक्त असून, सहायक आयुक्त यवतमाळ यांच्याकडे पदभार दिला आहे. तर, सहायक आयुक्तांचीही दोन पदे रिक्त आहेत. औषध निरीक्षकाची १२ पदे मंजूर असून, त्यापैकी केवळ दोन औषध निरीक्षक विभागातील पाच जिल्ह्यांत कार्यरत आहेत. यावरून हा विभाग कसा काम करत असेल याचा अंदाज येतो. औषधांची होलसेल आणि रिटेल विक्री करणाऱ्या दुकानांची संख्या हजारोंच्या घरात आहे. अशा प्रत्येक दुकानांपर्यंत या विभागातील अधिकाऱ्यांना वर्षातून एकदा भेट देणेही शक्य नाही. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात दोन हजारांवर औषध दुकाने आहेत. अशा स्थितीत दुय्यम दर्जाची व बनावट औषध बाजारात विक्रीला चांगली संधी आहे. यातून एक प्रकारे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. तपासणीच होत नसल्याने औषध दुय्यम की बॅन्डेड याची पडताळणी होत नाही. त्यामुळे बाजारात मिळेल औषध दर्जेदार समजून घेण्याशिवाय कोणताच पर्याय सामान्य नागरिकांपुढे नाही.

आरोग्य निरीक्षकांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत, त्यातही गुप्त माहितीच्या आधारे काम करणारी यंत्रणा नाही. दुय्यम दर्जाची औषधे कुठे विकली जातात, याची गोपनीय माहिती काढून, अशा ठिकाणी धाड टाकत तेथील नमुने गोळा करणे त्यानंतर ते प्रयोगशाळेत पाठवून विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. यासाठी पूर्णवेळ अधिकाऱ्यांची गरज आहे. हा प्रकार मागील काही वर्षात अमरावती विभागातील एकाही जिल्ह्यात झाल्याची नोंद नाही. यासोबतच रक्तपेढी आणि रक्त साठवण करणाऱ्या केंद्रांचीही नियमित पाहणी करावी लागते. तेथे निकष मोडले जात असेल, तर रुग्णाला धोका निर्माण होतो. काही जिल्ह्यांमध्ये आयुर्वेदिक औषधांचे उत्पादन केले जाते. याचीही पडताळणी करणे आवश्यक आहे. अशा उत्पादनात ते सांगतात तेच घटक आहेत का हे पडताळणे महत्त्वाचे आहे. परंतु, यासाठीसुद्धा मर्यादित मनुष्यबळामुळे अडथळे येत आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळmedicinesऔषधं