लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील नागपूर रोडवर असलेल्या रामरहीमनगरातून घर झडतीत चार धारदार तलवारी आणि एक खंजर जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी ही कारवाई केली. या प्रकरणात अब्दुल शकील अब्दुल मुनाफ याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार यांना रामरहीमनगरातील अब्दुल शकील अब्दुल मुनाफ (३०) याच्या घरात घातक शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाली. या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सचिन पवार यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पाचकवडे, विनोद चव्हाण यांना सोबत घेऊन अब्दुल शकील अब्दुल मुनाफ याच्या घरी धाड टाकली. त्याच्या घरातून चार धारदार तलवारी, एक खंजर आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला.जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरसकर यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. बंडू डांगे, विशाल भगत, हरिश राऊत, गजानन हरणे, ममता देवतळे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग नोंदविला.
रामरहीमनगरातून चार तलवारी व खंजर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 06:00 IST