शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
3
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
5
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
6
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
7
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
8
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
9
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
10
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
11
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
12
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
13
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
14
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
15
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
16
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
17
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
18
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
19
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
Daily Top 2Weekly Top 5

करंजीच्या कोंबडबाजारात चार लाखांची उलाढाल

By admin | Updated: December 29, 2014 02:11 IST

करंजी ते मारेगाव मार्गावरील एका जंगलात अवघ्या काही तासात किमान चार लाख रुपयांची उलाढाल होणारा कोंबडबाजार चालविला जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

प्रवीण पिन्नमवार पांढरकवडाकरंजी ते मारेगाव मार्गावरील एका जंगलात अवघ्या काही तासात किमान चार लाख रुपयांची उलाढाल होणारा कोंबडबाजार चालविला जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. करंजी परिसरातीलच तिघांनी एकत्र येऊन हा कोंबडबाजार भरविणे सुरू केले. त्यासाठी पांढरकवडा येथील पोलिसांची एनओसी (नाहरकत) घेऊन त्यासाठी डिलींगही झाल्याची चर्चा आहे. करंजी रोडवर एका फॅक्ट्रीपासून आत जाणाऱ्या मार्गावर सुमारे एक किलोमीटरनंतर सुरू होणाऱ्या जंगलात हा कोंबडबाजार चालविला जात आहे. अलीकडेच सुरू झालेल्या या कोंबडबाजाराचे रविवार, बुधवार व शुक्रवार हे दिवस ठरलेले आहेत. सदर प्रतिनिधीने या कोंबडबाजाराला रविवारी दुपारी २ वाजता प्रत्यक्ष भेट दिली असता तेथील चित्र धक्कादायक होते. या कोंबडबाजारावर सुमारे एक हजार २०० शौकिनांची उपस्थिती होती. त्यात सामान्यांसोबतच श्रीमंत व प्रतिष्ठितांचाही समावेश होता. कुणी दुचाकीने तर कुणी चारचाकी वाहनाने आले होते. कोंबडबाजारापासून काही दूर अंतरावर ही वाहने लावली गेली होती. त्यात बोलेरोसारख्या महागड्या गाड्याही दृष्टीस पडल्या. तर प्रवासी वाहतूक करणारे काळी-पिवळी टॅक्सीची संख्याही बरीच होती. या टॅक्सीने काही लोक खेळण्यासाठी आले होते. कोंबडबाजारात कुणी अनोळखी व्यक्ती येतो का यावर नजर ठेवण्यासाठी खास सहा ते आठ टपोरी लोक नेमले गेले होते. त्यांच्या नजरा येणाऱ्यांमध्ये ओळख शोधत होत्या. गोल दोर बांधून त्या आत कोंबडांची झुंज सुरू होती. आणखी १० ते १२ कोंबड झुंजीसाठी तयार केले जात होते. त्यावर पैसेही स्वीकारले जात होते. याच परिसरात चार कॉर्नरला चेंगळ, तितलीभवरा सुरू होता. तेथेही शौकिनांची बरीच गर्दी होती. कोंबडबाजाराच्या ठिकाणी देशी दारूची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. देशी दारु कॅनमध्ये ठेवली गेली होती. दुपारी १२ वाजता सुरू होणारा हा कोंबडबाजार सायंकाळी ४ ते ५ पर्यंत चालतो. दुपारी २ नंतर हा कोंबडबाजार रंगात येतो. सदर प्रतिनिधीने प्रातिनिधिक स्वरूपात नव्यानेच सुरू झालेल्या करंजी जंगलातील कोंबडबाजाराला भेट देऊन तेथील वास्तव उघड केले. मात्र पांढरकवडा व वणी विभागात असे डझनावर कोंबडबाजार राजरोसपणे सुरू आहेत. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल केली जात आहे. या उलाढालीमध्ये खाकी वर्दीतील अनेक लाभार्थी असून, या लाभाचे ‘पाट’ यवतमाळ, अमरावतीपर्यंत वाहत असल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जाते. करंजीसह पांढरकवडा, वणी विभागातील कोंबडबाजार, दारू, जुगार अड्डे, मटका पोलिसांसाठी आव्हान ठरला आहे.