शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वाघिणीच्या दोन छाव्यांना पकडण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला आता मिळाले चार हत्तींचे बळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 16:18 IST

वनविभागाने नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी टी 1कॅप्चर मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेला दोन नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजता यश आले आणि वाघिणीला ठार करण्यात आले.

ठळक मुद्देवनविभागाने नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी टी 1 कॅप्चर मोहीम हाती घेतली होती. कॅप्चर छावा मोहिमेला चार हत्तींचे बळ मिळाले असून वन विभागाने मोहिमेच्या हालचाली वाढवल्या आहेत. मध्य प्रदेशात असलेल्या कान्हा-केसरी अभयारण्यातून वन विभागाला हे हत्ती उपलब्ध करून देण्यात आले आहे.

योगेश पडोळे 

यवतमाळ - वनविभागाने नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी टी 1 कॅप्चर मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेला दोन नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजता यश आले आणि वाघिणीला ठार करण्यात आले. त्यामुळे शूटिंग मोहीम ही आता वनविभागाने समाप्त केली. दोन छाव्यांना पकडण्याची आता मोहीम उरली आहे. यासाठी वनविभागाने दोन नोव्हेंबरपासूनच जंगल परिसरात गस्त लावण्याचे काम सुरू केले आहे. वाघिणीचे हे दोन छावे दहा ते अकरा महिन्याचे असून हे केवळ ससा, बकरीचे लहान पिल्लू व लहान प्राण्यांची शिकार करू शकतात.

त्यामुळे त्यांचा शिकारीचा प्रश्न मिटला असला तरी त्यांना ट्रेनकुलाइझ करून पकडण्याची मोहीम आता वन विभाग युद्धपातळीवर राबवित आहे. या मोहिमेसाठी शंभरच्या वर वनअधिकारी व कर्मचारी फौजेसह चार हत्ती ही कामाला लागले आहेत. त्यामुळे आता या कॅप्चर छावा मोहिमेला चार हत्तींचे बळ मिळाले असून वन विभागाने मोहिमेच्या हालचाली वाढवल्या आहेत. इतकेच नव्हे तर मोहिमेसाठी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी अजूनही ऑन फिल्ड आहे.

मध्य प्रदेशात असलेल्या कान्हा-केसरी अभयारण्यातून वन विभागाला हे हत्ती उपलब्ध करून देण्यात आले आहे. पांढरकवडा वन परिसरात राबवण्यात येत असलेली ही मोहीम उंच-सखल भागात आहे. त्यासोबत या भागात मोठ-मोठी झुडपे वाढलेली आहे. अशा ठिकाणी पायी फिरुन छाव्यांचा शोध घेणे किंवा त्याला बेशुद्ध करणे शक्य नाही. त्यामुळे अशा ठिकाणी हत्तीच्या मदतीने छाव्यांचा शोध घेतल्या जाणार आहे. हे दोन छावे माणसांवर हल्ला करून शिकार करण्याचे तंत्र अद्यापही शिकले नाही. त्यामुळे ते मनुष्यावर हल्ला करणार नाही या दोघांना पकडण्यासाठी वन विभागाने पथकाची ही निर्मिती केली असून दिवस रात्री ही मोहीम राबवून त्यांना ट्रेनकुलाइझ करून पकडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळTigerवाघ