शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

गोळीबारातील ‘बुलेट’वर तपास केंद्रित

By admin | Updated: January 1, 2015 23:08 IST

बीअरबारमधील गोळीबार प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून हॉटेल व्यवस्थापक आणि त्या टाईल्स् व्यावसायिकाला चौकशीसाठी पाचारण केले. मात्र हा व्यावसायिक भूमिगत झाला

बीअरबारप्रकरण : टाईल्स् व्यावसायिक भूमिगत, पोलिसांकडून पाचारण यवतमाळ : बीअरबारमधील गोळीबार प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून हॉटेल व्यवस्थापक आणि त्या टाईल्स् व्यावसायिकाला चौकशीसाठी पाचारण केले. मात्र हा व्यावसायिक भूमिगत झाला असून हॉटेल व्यवस्थापनानेही एक दिवसाची मुदतवाढ मागितली आहे. दरम्यान पोलिसांनी रिव्हॉल्वरमधून झाडल्या गेलेल्या त्या ‘बुलेट’वर लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या आठवड्यात दारव्हा रोडवरील एका पॉश हॉटेलच्या बीअरबारमध्ये गोळीबार झाला होता. त्यात हॉटेलच्या काचा फुटल्याने कारवाई टाळण्यासाठी पाच हजाराची तत्काळ भरपाईही दिली गेली. शहरातील एका टाईल्स् व्यावसायिकाने आपल्या परवाना प्राप्त रिव्हॉल्वरमधून हा गोळीबार केला होता. विशेष असे पोलीस यंत्रणा आणि त्यांचा खुफिया विभाग या घटनेपासून अनभिज्ञ होता. ‘लोकमत’ने या गोळीबारीचे वृत्त प्रकाशित करताच पोलिसांची झोप उघडली. एसडीपीओ कार्यालयाने या वृत्ताची दखल घेत चौकशी सुरू केली. त्या पॉश हॉटेलच्या व्यवस्थापनाला तसेच टाईल्स् व्यावसायिकाला बयानासाठी हजर राहण्याचा संदेश पाठविला गेला. मात्र हा व्यावसायिक आपल्या दुकानातून भूमिगत असल्याचे सांगितले जाते. हॉटेल व्यवस्थापनाने ३१ डिसेंबरच्या गर्दी व व्यवसायाचे कारण पुढे करून बयानासाठी एक दिवस विलंबाने हजर होण्याची परवानगी मागितली. पोलिसांनी ‘बुलेट’वर तपास केंद्रीत केला आहे. परवाना प्राप्त रिव्हॉल्वर असल्याने ती आत्मसंरक्षणासाठी आहे. या रिव्हॉल्वरमधील गोळी नेमकी कुठे आणि केव्हा झाडली याचा हिशेब पोलीस त्या टाईल्स् व्यावसायिकाला मागणार आहे. तो टाईल्स् व्यावसायिकही पर्यायी ‘बुलेट’ उपलब्ध होऊ शकते का याच्या प्रयत्नात आहे. तर पोलीसही एखादवेळी गोळी नेमकी केव्हा झाडली याचा अंदाज घेण्यासाठी ‘बॅलेस्टीक एक्सपर्ट’ची मदत घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)