शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फांदी अंगावर कोसळल्याने पाच वर्षीय चिमुकला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2022 05:00 IST

दिग्रस तालुक्यालगतच्या मानोरा तालुक्यातील शेंदोना गावाला शुक्रवारी मध्यरात्री वादळाने तडाखा दिला. वादळामुळे ३० घरांवरील टिनपत्रे उडाले. अनेक झाडे कोलमडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. या दरम्यान अंगणात झोपून असलेल्या एका ५ वर्षीय बालकावर पिंपळ वृक्षाची फांदी पडल्याने त्याचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शुक्रवारी जिल्ह्यात बरसलेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडून गेली. दिग्रस तालुक्यातील शेंदोना येथे वादळी वाऱ्यात झाडाची फांदी अंगावर पडल्याने पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. या अवकाळी पावसात उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी गारपीट झाल्याने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले.  जिल्ह्यात गुरुवारी आणि शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये जिल्ह्यातील यवतमाळ, नेर, राळेगाव, दारव्हा, बाभूळगाव, पुसद आणि उमरखेडमध्ये दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये कांदा, तीळ, ज्वारी, मूग, आंबा आणि भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात दहा हजार हेक्टरवर उन्हाळी पीक घेतले जात आहे. हे पीक काढणीच्या अवस्थेत आहे. याच वेळी अवकाळी पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला. गावामध्ये मजूर मिळत नाही यामुळे शेतातील पिके उभी आहेत. भुईमूग काढणीला आला आहे. तीळ उभा आहे. कांद्याची काढणी सुरू आहे. मुगाची कापणी सुरू आहे. भाजीपाला आणि आंबा पीक शेतशिवारात आहे. या पिकांना अचानक आलेल्या पावसाने चांगलाच फटका बसला आहे. काही भागांमध्ये गारपीट झाली. त्यात यवतमाळ आणि यवतमाळलगतच्या शेतशिवाराला फटका बसला आहे. भाजीपाला, फूल आणि फळपिकांना यातून नुकसान पोहोचले आहे. झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण होणार आहे. शेतकऱ्यांना उन्हाळ्यातील पिकांवरच खरिपातील पेरणीचे नियोजन करायचे होते. हे नियोजन अवेळी आलेल्या पावसाने बिघडले आहे. शनिवारी नुकसानग्रस्त भागामध्ये शेतकऱ्यांची धावपळ पाहायला मिळाली. चारा पिके सुरक्षित घरी नेता यावीत म्हणून सकाळपासूनच ट्रॅक्टर आणि बैलगाडी अशी वाहने गावाकडे जाताना दिसत होती.

वादळी वाऱ्याने वीज वितरण कंपनीला ८६ लाखांचा फटका

पहिल्याच अवकाळी पावसाने विजेचे खांब तुटले : शहरात रात्रभर वीज गूल 

- यवतमाळ : शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, वीज कंपनीचे खांब तुटून पडले. यामुळे ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शनिवारी दुपारपर्यंत काम सुरू होते. जिल्ह्यात वीज कंपनीला ८६ लाखांचा फटका बसला आहे.  शुक्रवारी आलेल्या वादळाने यवतमाळ, दिग्रस, दारव्हा, कळंब, बाभूळगाव, नेर या तालुक्यांमध्ये वीज वितरण कंपनीच्या संपूर्ण व्यवस्थेला हादरा बसला. यामध्ये उच्चदाब वीज वाहिनीचे १८६ पाेल तुटले. तर १७९ लघु वीज वाहिनीचे पोल वादळामध्ये तुटले. यामध्ये पाच किलोमीटर विजेच्या तारांचे नुकसान झाले. यात प्राथमिक अंदाजानुसार ८६ लाख रुपयांचे कंपनीचे नुकसान झाले आहे.  विजेच्या खांबांवर झाडाच्या फांद्या तुटून पडल्या, तर अनेक ठिकाणी खांब वाकल्याने त्या ठिकाणी वादळाने परिस्थिती बिकट केली. खांबांवरील तारा तुटल्याने या सर्व भागामध्ये अंधाराचे साम्राज्य होते. वीज वितरण कंपनीच्या अहवालानुसार जिल्ह्यात १०० ते १२० खांब या वादळामध्ये तुटले आहेत. यावरील विजेच्या तारा तुटल्याने कंपनीला मोठा फटका बसला आहे.  यामुळे पाणीपुरवठ्यासह दैनंदिन बाबींनाही याचा मोठा फटका बसला आहे. शनिवारी दुपारपर्यंत वीज कंपनीचे दुरुस्तीचे काम सुरू होते. यानंतर काही भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. काही भागात अजूनही वीज पुरवठा खंडितच आहे.  

शेंदोनात चौघेजण गंभीर जखमी 

झाडे कोलमडल्याने वीजपुरवठा खंडित : ३० घरांवरील टिनपत्रे उडाले

सिंगद : दिग्रस तालुक्यालगतच्या मानोरा तालुक्यातील शेंदोना गावाला शुक्रवारी मध्यरात्री वादळाने तडाखा दिला. वादळामुळे ३० घरांवरील टिनपत्रे उडाले. अनेक झाडे कोलमडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. या दरम्यान अंगणात झोपून असलेल्या एका ५ वर्षीय बालकावर पिंपळ वृक्षाची फांदी पडल्याने त्याचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले.नयन धनराज सातपुते (५) असे मृत बालकाचे नाव आहे. वासुदेव मारुती सातपुते (५०), धनाजी वासुदेव सातपुते (२८) व मंदाबाई बबन भोरकडे (५५) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ दिग्रसच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेने गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.तत्पूर्वी शुक्रवारी सायंकाळी वादळात ३० घरांवरील टिनपत्रे उडाले. लोकवस्तीतील झाडे मोठ्या प्रमाणात कोलमडल्याने घरे व वाहनांचे नुकसान झाले. झाडांमुळे वीज तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. गणेश भुराजी गोदमले (६) या बालकाच्या पायावर घराच्या टिनपत्रावरील दगड आपटला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला पुसदच्या रुग्णालयात दाखल केले आहे. आपद्ग्रस्तांना जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाकडून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

 

 

टॅग्स :Rainपाऊस