शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मध्यरात्री धुमाकूळ घालणारे पाच दरोडेखोर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2022 23:07 IST

शेख शबीर शेख हनीफ (३५) रा. बिटरगाव यांच्या घराचा कोयंडा तोडून सात जण बळजबरीने घरात शिरले. त्यांनी शेख शबीर व त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण केली. रोख १५०० रुपये, सोन्याची पोत लुटली. नंतर लागूनच असलेल्या हनुमान मंदिरात दरोडेखोर गेले. तेथे संजय गंगाराम बुटले याला मारहाण करून दानपेटी फोडत तीन हजार रुपये रोख काढून घेतले. दरोडेखोर गावात शिरल्याची वार्ता पसरताच संपूर्ण गाव जागे झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कबिटरगाव : धारदार शस्त्र घेऊन बिटरगाव येथे दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीने सोमवारी मध्यरात्रीनंतर थेट एका घरात प्रवेश केला. तेथे दाम्पत्याला मारहाण करून गंभीर जखमी केले. जवळपास ५४ हजारांचा मुद्देमाल लुटला. त्यानंतर हनुमान मंदिरात दानपेटी फोडली. इतकेच नव्हे तर वनविभागाच्या चौकीवरही दगडफेक करीत त्याची तोडफोड केली. या घटनांनी गावात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थ व पोलिसांनी संयम दाखवित जंगलाच्या दिशेने पळालेल्या दरोडेखोरांचा पाठलाग केला. यातील पाच जणांना मुद्देमालासह अटक करण्यात आली. दोघे पसार झाले. शेख शबीर शेख हनीफ (३५) रा. बिटरगाव यांच्या घराचा कोयंडा तोडून सात जण बळजबरीने घरात शिरले. त्यांनी शेख शबीर व त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण केली. रोख १५०० रुपये, सोन्याची पोत लुटली. नंतर लागूनच असलेल्या हनुमान मंदिरात दरोडेखोर गेले. तेथे संजय गंगाराम बुटले याला मारहाण करून दानपेटी फोडत तीन हजार रुपये रोख काढून घेतले. दरोडेखोर गावात शिरल्याची वार्ता पसरताच संपूर्ण गाव जागे झाले. ग्रामस्थ दरोडेखोरांचा शोध घेऊ लागले. यामुळे दरोडेखोरांनी जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. या घटनेची माहिती बिटरगाव पोलिसांपर्यंत पोहोचली. ठाणेदार प्रताप भोस व काही ग्रामस्थ यांच्या मदतीने पथक तयार करण्यात आली.  जाकी बावाजी चव्हाण (२८) रा. सोनारी, ता. हिमायतनगर, जि. नांदेड, मांगीलाल श्रीरंग राठोड (३८) रा. हिमायतनगर, विकास श्रीरंग राठोड (२२) रा. हिमायतनगर, नीलेश गब्बरसिंग राठोड (२२) रा. हदगाव, दत्ता मांगीलाल राठोड (३०) रा. गणेशवाडी, ता. हिमायतनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन चाकू, एक रॉड, एक कुऱ्हाड, दोन मोबाइल ही घातक शस्त्रे जप्त केली. याशिवाय चोरीतील २२ तोळे चांदी, सात ग्रॅम सोन्याचा हार असा ७७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. बिटरगाव येथील पोलीस मित्रांना सोबत घेऊन ठाणेदार भोस, उपनिरीक्षक कपिल मस्के, शिपाई मोहन चाटे, अतिश जारंडे, गजानन खरात, रवी गिते, विद्या राठोड, दत्ता कुसराम, सतीश चव्हाण, नीलेश भालेराव, स्वप्निल रायवाडे, फिरोज काझी, होमगार्ड चंद्रमणी वाढवे यांनी आरोपीला घटनेनंतर अवघ्या चार तासात अटक केली. या कारवाईची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे बिटरगाव येथे पोहोचले. आरोपींकडून इतरही दरोड्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे. याचा तपास उपनिरीक्षक कपिल मस्के यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरोड्याच्या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

वनविभागाच्या चौकीवर हल्ला करून तोडफोड - वनविभागाची चौकी लागली. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. या कॅमेऱ्यात आपण कैद झालो असा संशय त्यांना आला. दरोडेखोरांनी चौकीवर हल्ला चढविला. तेथील वन कर्मचारी राजू देवकते यास जरब दाखवित चौकीतील साहित्याची तोडफोड केली. दरोडेखोर आक्रमक होते.  मोबाईलच्या उजेडात पळणारे दरोडेखोर राखणदारांच्या नजरेस पडले. त्यावरुन माग काढला. 

दोन दरोडेखोर झटापटीत झाले पसार - एक पथक गांजेगावकडे तर दुसरे जेवली पिंपळगाव येथे रवाना झाले. गांजेगाव येथील पथकाने दोन दरोडेखोरांना पकडले तर पिंपळगावचे पथक पुलावर दबा धरून बसले होते. दरोडेखोरांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. याचा प्रतिकार करीत पोलीस व ग्रामस्थ दरोडेखोरांवर चालून गेले. येथे तीन जणांना ताब्यात घेतले. दोन दरोडेखोर या झटापटीत पसार झाले. 

 

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिस