शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

पहिल्या लोकसभेचे साक्षीदार पुखराजजी बोथरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 22:13 IST

पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून सतत सर्व लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणारे १०२ वर्षांचे ज्येष्ठ मतदार पुखराजजी उमीचंदजी बोथरा, हे १७ व्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी सज्ज आहे.

ठळक मुद्दे१०२ वर्षांचे मतदार : स्वातंत्र्य संग्राम बघितला, अनेक नेत्यांच्या आठवणी स्मरणात

अशोक पिंपरे।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून सतत सर्व लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणारे १०२ वर्षांचे ज्येष्ठ मतदार पुखराजजी उमीचंदजी बोथरा, हे १७ व्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी सज्ज आहे.१७ एप्रिल १९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण त्यांना आजही आठवते. त्यावेळी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती. राळेगाव मतदार संघाचा भाग मध्यप्रदेश प्रांताशी जोडला होता. वर्धा लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रथम मतदान केले, हे विशेष. २८ जानेवारी १९१७ रोजी जन्मलेले हे आजोबा आता १०२ वर्षांचे आहे.स्वातंत्र्य संग्रामाची स्थिती त्यांनी डोळ्यांनी पाहिली. वर्धा येथे शिक्षण घेत असताना त्यांनी राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या सभा जवळून बघितल्या. सेवाग्राम आश्रमात जाऊन दूरुन महात्मा गांधी यांना बघायचे. विदेशी कपड्याची होळी शहरात होत असताना टोप्या, कपडे जळताना त्यांनी पाहिल्या.विद्यार्थी असल्याने हे सर्व त्यांनी डोळ्यांनी बघितले. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांना जवळून पाहण्याचा क्षण सांगताना त्याचे तारुण्य जागृत झाले होते.आता परिस्थिती बदलल्याची खंतपहिल्या लोकसभा निवडणुकीचा अनुभव कथन करताना जेव्हा राजकीय लोकांचा तेव्हाच्या परिस्थितीचा त्यांनी उल्लेख केला. आता परिस्थिती बदलली आहे. त्यावेळी राजकीय वातावरण हे देशभक्तीचे होते. सध्या त्यांच्या डोळ्यांना बरोबर दिसत नाही, ऐकायला येत नाही. तरीही बसून नातवंडासोबत रममान होत असतात. नेमके काय होत आहे, याची माहिती कुटुंबियांकडून ते जाणून घेतात. तरूण पिढीने लोकशाहीच्या या प्रक्रियेत मतदानाचा हक्क बजावावा, असे पुखराजजी बोथरा यांनी आवर्जून सांगितले.