शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पहिले बिरसा पर्व यवतमाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:09 IST

येत्या १५ नोव्हेंबरला बिरसा मुंडा यांची १४२ वी जयंती साजरी होणार आहे. यानिमित्त यवतमाळात ११ आणि १२ नोव्हेंबरला राज्यातील पहिल्या बिरसा पर्वाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

ठळक मुद्दे२५ आमदारांना निमंत्रण : समाज एकत्र येणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येत्या १५ नोव्हेंबरला बिरसा मुंडा यांची १४२ वी जयंती साजरी होणार आहे. यानिमित्त यवतमाळात ११ आणि १२ नोव्हेंबरला राज्यातील पहिल्या बिरसा पर्वाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.राज्यातील सर्व आदिवासी बांधवांना एकत्रित करण्यासाठी येथे बिरसा पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वामध्ये सर्व समाज एकत्र येणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील २५ आमदारांना निमंत्रित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून बोगस आदिवासींवर कारवाई करावी, हा बिरसा पर्वाचा मुख्य उद्देश असल्याचेही बिरसा पर्व समितीच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत सांगितले.सर्वोच्च न्यायालयाने बोगस आदिवासींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र राज्य शासनाने पावले उचलली नाही. राज्यात एक लाख ९५ हजार ५६० बोगस आदिवासी आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पावले उचलावी. याकरिता लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, याविषयावर बिरसा पर्वात चर्चा होणार आहे. या कार्यक्रमाच्या चारही सत्रांचे उद्घाटन राज्य विधीमंडळाच्या आदिवासी जनजाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार अशोक उईके करणार आहेत. या पर्वाला राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे उपाध्यक्ष खासदार अनुसया उईके, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आमदार राजू तोडसाम, माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके, प्रमुख प्रवक्ते अ‍ॅड. सुमित्रा वसावा आदी उपस्थित राहणार आहे.पत्रकार परिषदेला बिरसा पर्व समितीचे अध्यक्ष राजू चांदेकर, सचिव किशोर उईके, कार्याध्यक्ष गुलाब कुडमेथे, उपाध्यक्ष शैलेश गाडेकर, कोषाध्यक्ष बंडू मसराम, संघटक राजू केराम, अरूण पारधी, दीपक करचाल, श्रीकांत कनाके, नीलेश आत्राम आदी उपस्थित होते.