शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

भयंकर! शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यावर भररस्त्यात झाडल्या गोळ्या, आरोपी पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 18:41 IST

उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले बालरोग तज्ज्ञ डॉ. हनुमंत धर्मकारे हे पुसद रोड वरील गोरखनाथ हॉटेल समोरून रुग्णालयात जात असताना अज्ञात युवकाने त्यांच्यावर तीन ते चार गोळ्या झाडल्या.

ठळक मुद्देवैद्यकीय अधिकारी रक्ताच्या थारोळ्यात, प्रकृती चिंताजनकउमरखेड येथील घटना

यवतमाळ : उमरखेड येथील वैद्यकीय अधिकाऱ्यावर अज्ञाताने भर रस्त्यावर गोळ्या (Firing)) झाडल्याची घटना उघडकीस आली आहे. डाॅ. हनुमंत धर्मकारे हे या गोळीबारात गंभीर जखमी झाले असून आरोपी पसार झाला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उमरखेड-पुसद मार्गावर साकळे विद्यालयापुढे घडली.डॉ. हनुमंत धर्मकारे (वय ४५) हे मागील ७ वर्षांपासून उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय उमरखेड बसस्थानकाच्या समोर त्यांचे खासगी बाल रुग्णालय आहे. गेल्या ७ वर्षाच्या काळात त्यांची कारकीर्द सर्वसमावेशक राहिलेली आहे. या शिवाय कुठल्याही वादाच्या विषयात त्यांचे नाव चर्चेत आले नाही. दरम्यान, आज अचानक त्यांच्यावर अज्ञात तरुणाने गोळीबार केल्यामुळे शहरात चर्चेला पेव फुटले आहे.

शहरातील उत्तरवार रुग्णालयाच्या नजीकच असलेल्या गोरखनाथ हॉटेल येथे चहा पाण्यासाठी त्यांची  बैठक असते. सायंकाळी ५ वाजताच सुमारास मोटर सायकलने स्वत:च्या खासगी दवाखानाकडे जात असताना अज्ञात युवकाने त्यांच्यावर बंदूक रोखून तीन ते चार गोळ्या झाडल्या. त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी युवकाला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो दुचाकीने पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला धर्मकारे यांना नागरिकांनी उचलून येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर धर्मकारे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. दरम्यान, ही घटना शहरात वार्‍यासारखी पसरली असून नागरिकांनी शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली. विशेष म्हणजे आज माजी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील हे उमरखेडच्या दौऱ्यावर होते.  त्यांनीही घटनास्थळी भेट दिली त्यांच्यासोबत आमदार नामदेव ससाने, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा होते. उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी, उमरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारdoctorडॉक्टर