शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

माहूरगडावरील दत्तशिखर संस्थानाच्या गोदामास आग; लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 16:36 IST

यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या प्रसिद्ध माहूर गडावर शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीत सुमारे १० लाखांचे सामान जळून खाक झाले आहे. या अपघातात कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

ठळक मुद्देआगीचे कारण गुलदस्त्यातजिवीतहानी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या प्रसिद्ध माहूर गडावर शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीत सुमारे १० लाखांचे सामान जळून खाक झाले आहे. या अपघातात कुठलीही जिवीतहानी झाली नाही.माहूर येथील श्री दत्तशिखर संस्थानच्या गोदामास शॉट सर्किटने आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी ४ :०० ते ४:३० च्या दरम्यान घडली. या आगीमध्ये दत्तशिखर संस्थानच्या साडी, पातळे व नारळ प्रसादासह फर्निचर जळून खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटनेचा मंडळ अधिकारी येरावार यांनी पंचनामा केला आहे.या घटनेची माहिती प्राप्त होताच माहूर न.प. च्या मुख्याधिकारी विद्या कदम व कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी तत्काळ घटनास्थळी हजेरी लावली व माहूर नपच्या अग्निशमन दलाचे वाहनासह किनवट, पुसद, उमरखेड येथील अग्निशामक दलास पाचारण करून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी माहूर, महागाव येथील रुग्णवाहिका व श्री रेणुकादेवी संस्थानची रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती. बचाव कायार्साठी रेणुकादेवी संस्थानचे सचिव किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी शक्ती कदम व तहसीलदार विक्रमसिंग राजपूत यांनी रेणुकादेवी संस्थानच्या सुरक्षा रक्षकांची चमू पाठवली होती.घटनेचे वृत्त परिसरात समजताच तहसीलदार विक्रमसिंग राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, प्राचार्य भगवानराव जोगदंड आदीसह बहुतांश राजकीय, सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते व दत्तभक्तांनी दत्तशिखर मंदिराकडे धाव घेऊन बचावकार्यात उडी घेत आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले त्यात नायब तहसीलदार उत्तमराव कागणे, माहूरचे नगरसेवक इलियास बावाणी संस्थानचे कर्मचारी भागवत म्हस्के, संजय सुरोशे, दत्ता मोरे, अ‍ॅड.श्याम गावंडे, प्रा.प्रवीण बिरादार, आनंद तुपदाळे न.प. कर्मचाऱ्यांचे पथक, दत्तशिखर संस्थानचे सर्व कर्मचारी व दत्तभक्त आदीसह बहुसंख्य नागरिकांचा समावेश होता. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आग लवकर आटोक्यात आली असून या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाहीश्री क्षेत्र माहूरचे महत्त्वमाहूर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुकादेवी आहे. तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांचीदेखील प्राचीन मंदिरे माहूरगडावर आहेत. येथे मंदिरासमोरच एक किल्ला आहे. माहूर हे नांदेड शहरापासून १३० किलोमीटर अंतरावर आहे. चहूबाजूंनी डोंगरांनी आणि घनदाट जंगलांनी वेढले आहे.

.

टॅग्स :fireआग